Shivajirao Bhosale Bank | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फरार कर्ज वसुली अधिकाऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivajirao Bhosale Bank | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील (Shivajirao Bhosale Bank) गैरव्यवहार प्रकरणात मागील तीन महिन्यापासून फरार असलेल्या कर्ज अधीक्षक आणि वसुली अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हनुमंत संभाजी केमधरे (Hanumant Sambhaji Kemdhare) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. केमधरे हा फरार झाल्याने न्यायालयाने अटक वॉरंट (Arrest warrant) जारी केले होते. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे (Cyber Crime Branch) पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

विशेष पथकात पोलीस रवींद्र गवारी (Ravindra Gawri), शिरीष गावडे (Shirish Gawde) यांची नेमणूक करुन त्यांच्यावर आरोपीला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी काही दिवसांपूर्वीच बीएचआर (BHR) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडरे (Jitendra Kandre) व सुनील झंवर (Sunil Zanwar) यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले होते. केमधरे याला न्यायालयाने 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, महेंद्र जगताप, उपनिरीक्षक महेश मते, महिला पोलीस अमंलदार कोमल पडवळ करीत आहेत.

ED | शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या कार्यालये, निवासस्थानावर ईडीचे छापे

दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या (Pune police) आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमदार अनिल शिवाजीराव भोसले MLA Anil Shivajirao Bhosale (वय-55 रा. बाणेर रस्ता), सूर्याजी पांडुरंग जाधव (वय-69 रा. कमला नेहरु पार्क), तानाजी दत्तु पडवळ (वय-50 रा. तापकीरनगर, काळेवाडी), शैलेश संपतराव भोसले (वय-47 रा. नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर), पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास विठ्ठल बांदल Mangaldas Bandal, हितेन उर्फ हितेंद्र विराभाई पटेल आणि मनोजकुमार प्राणनाथ अब्रोल यांना अटक केली आहे.

सोशल मीडियामुळे अडकला जाळ्यात

केमधरे याने तो वापरत असलेले सर्व मोबाईल बंद केले होते. तो त्याच्या कुटुंबातील कोणासोबतही संपर्क साधत नव्हता.
परंतु गवारी आणि गावडे यांनी आरोपी वापरत असलेल्या टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम व सोशल मीडिया
(Social media) या सर्वांचा तांत्रिक तपास करुन त्याचा ठावठिकाणा शोधून काढला.
पोलिसांनी केमधरे याला त्याचा मित्र रज्जाक मुलाणी याच्या पुरंदर (purandar) येथील फार्म हाऊस येथून अटक केली.

हे देखील वाचा

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 183 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Shivajirao Bhosale Bank | pune shivajirao bhosale co operative bank debt recovery officer arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update