India Weather Update | कुठे उन्हाच्या झळा, तर कुठे पावसाचा इशारा; काय सांगतोय ‘IMD’चा अंदाज?

मुंबई/नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – India Weather Update | भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट उसळली आहे. दिल्लीसह अनेक राज्यात तीव्र उष्णता जाणवत (India Weather Update) आहेत. यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे केरळ (Keral) आणि आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरवासीयांना उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Cyclone) अनेक राज्यांत आल्हाददायक वातावरण आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department-IMD) अंदाजानुसार, दिल्लीत कडक उन जाणवत आहे. दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस (India Weather Update) आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर जोरदार उष्ण वारे वाहतील आणि आर्द्रता राहील. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांना घरातच राहावे लागत आहे. दि.15 जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विविध राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. बिहार (Bihar), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), झारखंड (Jharkhand), ओडिशाच्या (Odisha) अनेक भागात उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओडिशातील कमाल तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. याशिवाय या राज्यांमध्ये तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, हवामानाच्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर,
मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडू शकतो.
याशिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल
आणि अंदमान-निकोबार, सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे. यासोबतच दिवसभर हवामान कोरडे राहील.
राजस्थानमध्ये वादळामुळे हवामान कोरडे राहील. 16 ते 17 जून रोजी राज्याच्या नैऋत्य भागात मुसळधार
पावसाची शक्यता आहे.

Web Title :   India Weather Update | imd weather update alert for heatwave 13 june 2023 up delhi ncr mp rainfall in kerala

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Disaster Management Pune – Mumbai | पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पुण्यातील आजचा दर काय? जाणून घ्या