Maharashtra Political Crisis | मंत्रिपदाच्या चढाओढीतून शिंदे गटातील दोन आमदार भिडले; मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने वाद मिटला!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील प्रवेशाने शिंदे गटात नाराजी पसरली आहे. दरम्यान, मंत्रीपदावरून शिंदे गटात दोन गट निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारी शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये बाचाबाची आणि झटापट (Maharashtra Political Crisis) झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांच्या भांडणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नागपूरचा (Nagpur) दौरा सोडून मुंबईत परतले असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

चर्चेत असणा-या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी शिवसेनेचे शिंदे गटाचे दोन आमदार एकमेकांशी भिडले (Maharashtra Political Crisis) होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना नागपूरहून मुंबईचा अधिकृत दौरा सोडून मंगळवारी मुंबईत परतावे लागले. याच दिवशी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. त्यात अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 8 मंत्र्यांचाही समावेश होता. त्यानंतरच अर्थखाते अजित पवार यांच्याकडे दिले जात असल्याचे ऐकायला मिळत होते.

दरम्यान, याच बैठकीनंतर मंत्रिपदावरून दोन आमदारांमध्ये (Two MLAs) जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाल्याची चर्चा आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत या दोन आमदारांची मनधरणी करण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांना करावे लागले. एक वर्ष मंत्रीपद भूषविणाऱ्यांना हटवून मंत्री करावे, अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली. सरकारमध्ये तिसऱ्या पक्षाच्या प्रवेशामुळे आमदारांची अस्वस्थता वाढली असल्याचे दिसते.

काय म्हणाले उदय सामंत?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री उशिरा एक बैठक पार पडली. त्यानंतर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या प्रश्नावर थेट उत्तर दिले आहे. शिंदे गटात अजित पवारांमुळे नाराजी पसरली आहे का? असा प्रश्न विचारला असता उदय सामंत म्हणाले, की ही बातमी तुम्हाला कुठून समजली ते माहित नाही. शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे आमदार-खासदार (MLA-MP) नाराज नाहीत. आमचा दहा हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास आहे.

ज्या घडामोडी झाल्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून विश्वासात घेऊन झाल्या आहेत. मी ठामपणाने सांगू शकतो की लोकसभा-विधानसभा निवडणूक (Lok Sabha-Assembly Election) ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढली जाईल. राष्ट्रवादी पक्षाशी युती झाल्याने किंवा ते महायुतीमुळे शिंदे गटात नाराजी आहे, अशी काहीही चर्चाही झालेली नाही. कुणीही नाराज नाही” असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Web Title :   Maharashtra Political Crisis | cm eknath shinde left his nagpur tour and went to mumbai to resolve the feud between shinde mlas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा