Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचा फैसला पुन्हा लांबवणीवर?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Govt) येत्या 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) फैसला होणार अशी चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांवर अपात्रतेच्या (Disqualification) कारवाईच्या मागणीवरुन ठाकरे गटाकडून (Thackeray Group) याचिका दाखल (Maharashtra Political Crisis) करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार, असं मानलं जात होतं. मात्र ही सुनावणी आता लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकार बाबतच्या (State Government) याचिकांवर 1 ऑगस्ट ऐवजी 2 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 

सुप्रीम कोर्टाच्या पुढील आठवड्यातील सुनावणीची यादी येत असते. या यादीनुसार 2 ऑगस्टला राज्य सरकारच्या फैसल्याबाबतील याचिकेवरील (Petition) सुनावणी (Hearing) होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे घटनात्मक खंडपीठापुढे (Constitutional Bench) ही सुनावणी होणार अशी चर्चा होती. पण अद्याप घटनात्मक खंडपीठाची स्थापना (Maharashtra Political Crisis) करण्यात आली नाही. यापूर्वी 20 जुलैला सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन वी रमन्ना (Chief Justice N V Ramana), न्या. कृष्णा मुरारी (Justice Krishna Murari), न्या. हिमा कोहली (Justice Hima Kohli) यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होईल असे सांगण्यात आले होते.

घटनात्मक खंडपीठ हे 3,5,7,11 न्यायाधिशांचे असते. मात्र अद्याप घटनात्मक खंडपीठ स्थापन झाले नाही. केस लिस्टेड आहे. मात्र सुनावणी ही 1 ऑगस्ट ऐवजी 2 ऑगस्टाल होण्याची शक्यता आहे.

 

20 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. कलम 32 अंतर्गत दोन्ही गटांनी आधी हायकोर्टात (High Court) जायला हवं होतं.
याप्रकरणावर घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी झाली पाहिजे. जर आमदारांनी पक्ष सोडला आहे,
तर फुटला कसा? असे मुद्दे कोर्टाने मांडले होते. यानंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होईल, असे स्पष्ट केलं होतं.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | hearing regarding eknath shinde devendra fadnavis government will be held on 2 august

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | सर्वांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी ?

 

Maharashtra Political Crisis | बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

 

Business News | लक्षात ठेवा ! 1 ऑगस्टपासून बदलतील तुमच्या बँकेशी संबंधीत ‘हे’ नियम, खिशावर होईल थेट परिणाम