Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील शिक्षकाचा राजीनामा, राजीनामा पत्र व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेना बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA), खासदारांनी (MP) खिंडार पडल्यानंतर ठाकरे कुटुंबियांसाठी जनमाणसात सहानुभूतीची लाट असल्याचे दिसत आहे. अनेकजण शिवसेनेत दाखल होऊन संघटनेसाठी काम (Maharashtra Political Crisis) करण्याची तयारी दाखवत आहेत. आता एका शिक्षकाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा देण्यासाठी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा (Pune Teacher Resigns) दिला आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluk) वालचंदनगर (Walchandnagar) येथील एका शाळेत कार्यरत होते. दीपक पोपट खरात (Deepak Papat Kharat) असे त्यांचे नाव आहे.

 

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणारा बहुधा राज्यतील हा पहिलाच शिक्षक असावा. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. खरातांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. दीपक खरात यांनी राजीनाम्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत शिवसेनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. 27 जुलै 2022 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. 1 फेब्रुवारी 2002 पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्रमांक 3 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा 20 वर्ष सहा महिने इतकी झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात गेलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli)
यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे (Prashant Surve) यांनी शिवसेने प्रवेश केला.
तर आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही शिवबंधन हाती बांधले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते, ज्यांना मोठे केले ते निघून गेलेत.
आता सामान्य लोकांना अतिसामान्य करायचे आहे, त्यांची नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे,
पण आपल्याला असलेल्या शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | Pune indapur school teacher deepak popat kharat resigns to support shiv sena chief uddhav thackeray joins party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | सर्वांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी ?

 

Maharashtra Political Crisis | बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

 

Business News | लक्षात ठेवा ! 1 ऑगस्टपासून बदलतील तुमच्या बँकेशी संबंधीत ‘हे’ नियम, खिशावर होईल थेट परिणाम