Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! “पिक्चर अभी बाकी है”; मनसेचं सूचक Tweet

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राज्यात सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) पेच कायम दिसत आहे. कालच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बंडखोर आमदारांना दिलासा दिला आहे. यानंतर आता महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याची शक्यता वर्तवली जातेय. या घडामोडीनंतर आता भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आला आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार असल्याने बंडखोर आमदारांना कोणत्यातरी पक्षात विलीन होण्याची गरज असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) चर्चेत दिसत आहेत. एकनाथ शिंदे आणि राज यांच्यात नुकतेच फोन झाल्याने चर्चेला उधाण आलंय. यातच मनसेने एक सूचक ट्विट केलं आहे.

 

 

मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी सोमवारी रात्री एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले होते की, “असा हा ‘धर्मवीर’… एक ‘राज’ की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है!’ ” या ट्विटमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडनाट्यात आगामी काळात खरंच राज ठाकरे यांची काही भूमिका असू शकते का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Maharashtra Political Crisis)

दरम्यान, शिवसेनेच्या एकूण 55 आमदारांपैकी 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
अशातच आता एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आलीय.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात दोनवेळा फोनवर बोलणे झाले आहे.
राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती.
त्यामुळे राज यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केल्याची माहिती आहे.
यावेळी राज्याच्या राजकीय घडामोडींवरही चर्चा झाल्याचे समजते.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | Raj thackeray take entry in maharashtra political crisis eknath shinde revolt against shivsena MNS chief said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा