Mumbai Building Collapse | मुंबईत मोठी दुर्घटना ! कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 9 जण रुग्णालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Building Collapse | मुंबईतील कुर्ला भागातील एक चार मजली इमारत आज मंगळवारी पहाटे कोसळली (Mumbai Building Collapse) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत समजताच अग्निशामकदल आणि एनडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून बचावाचे कार्य सुरुच आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू (Died) झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे, आतापर्यंत 7 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार माहिती अशी, ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी हजर आहेत. बचाव कार्यात आतापर्यंत 7 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात 8 ते 10 कुटुंबे राहत होती, सर्व भाडेकरू आहेत. (Mumbai Building Collapse)

दरम्यान, “आमचा अग्रक्रम आहे, की सर्वांना वाचवणे, तसेच, जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरित जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये.” असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Mumbai Building Collapse | A 4-storey building collapses in Naik Nagar. Fire brigade team, police at the spot as rescue operation continues Kurla, Mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा