Maharashtra Political Crisis | ‘अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही…’ शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा; सामंतांच्या कार हल्ल्यावरुन राजकारण तापलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde Group) आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत (MLA Uday Samant) यांच्या कार वर काल पुण्यात हल्ला (Attack) करण्यात आला. याप्रकरणी काही शिवसैनिकांना अटक (Shiv Sainik Arrest) करण्यात आली. या हल्ल्याचा निषेध करताना शिंदे गटाच्या आमदारांकडून संतप्त प्रतिक्रिया (Maharashtra Political Crisis) उमटत आहेत. शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील संघर्ष आता पुढच्या टप्प्यावर जाताना पहायला मिळत आहे. बंडखोर आमदार अब्दुल सत्तार (Rebel MLA Abdul Sattar) यांनी यावर भाष्य केलं आहे. अन्यथा आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

 

आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असेल, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील. या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे, ती निश्चितच लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचे आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असेल तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागेल. एकाकडून मारलं जात असेल तर दुसऱ्याकडून बघ्याची भूमिका घेतली जाऊ शकत नाही, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

उद्धव ठाकरेंवर कारवाई करावी लागेल

हा हल्ला करणाऱ्या दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
तसेच या हल्ल्यामागे कोण आहे, त्याचा देखील शोध घेतला पाहिजे, अशी मागणी सत्तार यांनी केली.
तर शिवसेना नेते बबन थोरात (Baban Thorat) यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले, बबन थोरात यांचे वक्तव्य मी ऐकले आहे.
त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल.
कोणी असे वक्तव्य करत असेल आणि उद्धव ठाकरे त्यांचा सत्कार करत असतील, तर उद्धव ठाकरेंचा यासर्व प्रकाराला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ निघतो.
त्यामुळे उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, असेही सत्तार म्हणाले.

 

Web Title : –  Maharashtra Political Crisis | rebel mla abdul sattar criticised shiv sena chief uddhav thackeray over uday samant attacks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा