Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद धोक्यात ! एकनाथ शिंदेंसह 7 आमदारांवर 24 तासात होणार कारवाई?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या 38 आमदारांनी बंडखोरी (Rebel Shivsena MLA) करत उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारमधून (Mahavikas Aghadi Government) बाहेर पडावं, अशी मागणी केली. शिवसेनेचे आमदार सुरत मार्ग गुवाहाटीमध्ये पोहोचले. बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर शिवसेनेकडून कारवाई (Maharashtra Political Crisis) करण्यात येत आहे. 16 आमदारांची आमदारकी रद्द करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आता मंत्र्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपाल कार्यालयात (Governor Office) यासंदर्भातील पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती समोर येतेय.

 

‘या’ मंत्र्यांवर होणार कारवाई
राज्याच्या 7 मंत्र्यांना बरखास्त करण्यात यावं, असं पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपाल कार्यालयाला पाठवलं जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), बच्चू कडू (Bachchu Kadu), अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद बरखास्त करण्यासाठी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिलं जाईल, अशी माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी काही वेळापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत संकेत दिले होते. जे लोक गेले आहेत त्यांच्यावर 24 तासात कारवाई केली जाईल, असं राऊत म्हणाले होते.

 

दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता हे बंड मोडून काढण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र (Ineligible) ठरवण्याची मागणी केली होती. त्यासाठीचा अर्ज विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आला होता. त्यानंतर आज विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना आता सोमवारी 27 जून पर्यंत 5.30 वाजेपर्यंत नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे.
या कालावधीत नोटिसीला उत्तर दिले नाही तर या नोटिसीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या आमदारांना नोटीस
एकनाथ शिंदे (Eknath Shinde), तानाजी सावंत (Tanaji Sawant), प्रकाश सुर्वे (Prakash Surve),
बालाजी किणीकर (Balaji Kinikar), अनिल बाबर (Anil Babar), लता सोनवणे (Lata Sonawane),
यामिनी जाधव (Yamini Jadhav), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), भरत गोगावले (Bharat Gogavale),
संदिपान भुमरे (Sandipan Bhumare), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), महेश शिंदे (Mahesh Shinde),
चिमणआबा पाटील (Chimanaba Patil), संजय रायमूलकर (Sanjay Raymulkar), बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar), रमेश बोरणारे (Ramesh Boranare)

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader cm uddhav thackeray cmo office will be sent letter to governor office for seven minsiter disqualification maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut |  ‘…तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते’ – संजय राऊत

 

Maharashtra Political Crisis | ‘आम्ही सरकार पाडणार नाही, पण…’; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं

 

Maharashtra Political Crisis | रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट ? पुढील प्लान आखल्याची चर्चा