Maharashtra Political Crisis | दुसऱ्या पक्षात सामील होणं म्हणजे बंडखोरी, शिंदे गटाकडून महत्वाचा युक्तीवाद; जाणून घ्या कोणी कसा, काय केला युक्तीवाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि समर्थक आमदारांनी वेगळा गट तयार करुन शिवसेना (Shivsena) आपली असल्याचा दावा केला आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्न उपस्थितीत झाला असून आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु झाली आहे. शिंदे वकील हरिश साळवे (Advocate Harish Salve) यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, एका मुख्यमंत्र्यांच्या (CM) राजीनाम्यानंतर दुसऱ्या मुख्यमंत्र्याने शपथ घेणे चुकीचे नाही. तसेच पक्षात आवाज उठवणे चुकीचं नाही. लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षांतर्गत (Maharashtra Political Crisis) आवाज उठवता येतो असे साळवे यांनी म्हटले आहे. कारण शिंदे गटाकडून पहिल्या दिवसांपासून आम्ही शिवसेनेविरोधात कोणतेही काम केलेले नाही, असे स्पष्ट करता आले आहे. त्यामुळे लक्ष्मण रेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवता येतो असे साळवे यांनी म्हटले आहे. 20 आमदारांचा पाठिंबा न मिळालेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद बहाल करावं या कल्पनेत आपण आहोत का? अशी विचारणा हरिश साळवे यांनी केली आहे.

 

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांचा युक्तीवाद

– शिवसेनेतून वेगळे झालेले आमदार अपात्र, घटनेच्या 10 सूचीनुसार आमदार (MLA) अपात्र

– अपात्रतेचा मुद्दा न्यायप्रविष्ट, त्यामुळे राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण अवैध

– अपात्र आमदाराकडून झालेली विधानसभा अध्यक्षांची निवड अपात्र

– कोर्टाने विधानसबेचं रेकॉर्ड मागवावं, त्यातून आतापर्यंत काय करावाई झाली, कशी झाली तपासावी.

ठाकरे गटाकडून अभिषेक मनूसिंघवी (Abhishek Manusinghvi) यांचा युक्तीवाद

– गुवाहाटीला गेलेल्या आमदारांकडून अनधिकृत ईमेल

– फुटीर गटाला कोणत्या तरी पक्षात विलीन होणं आवश्यक

– विलिनीकरण हाच एकमेव पर्याय, अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन

– अपात्रतेचा निर्णय झाला नसताना आमदारांचा बहुमत चाचणीत समावेश कसा?

 

शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तीवाद

– पक्षात राहून बहुमताच्या आधारावर पक्षप्रमुखांवर सवाल उपस्थित करु शकत नाही का?

– राजकीय पक्षाची कार्यप्रणालीही लोकशाही मुद्यांवरच चालायला हवी

– पक्षांतरबंदी कायदा स्वयं-कार्यक्षम नाही. याचिका करावी लागेल

– जर पक्ष बदलला किंवा व्हिप डावलला तरच आमदारी रद्द होऊ शकते, पण 15-20 आमदारांचं समर्थन असलेल्यांवर कारवाई कशी होईल.

– ज्यांना 20 आमदारांचा पाठिंबा नाही ते मुख्यमंत्रिपदावर कसे राहू शकतात?

– लक्ष्मणरेषा न ओलांडता आवाज उठवणं म्हणजे बंडखोरी नाही.

– पक्षात राहूनच एखाद्या नेत्याविरोधात आवाज उठवणं बंडखोरी नाही

– पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील होणं बंडखोरी ठरते.

– यापूर्वी पक्षांतर्गत बाबीमध्ये कोर्टाचा हस्तक्षेप नव्हता

– पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी तक्रार आवश्यक

– पक्ष सोडला तर पक्षांतरबंदी कायदा लागू होते.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court to hear plea of shiv sena chief uddhav thackeray and rebel mlas leader eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले’ – रावसाहेब दानवे

 

Pune Crime | पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने चाकूने भोसकून तरुणाचा खून; पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील घटना

 

Pune ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात