Pune Crime | पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने चाकूने भोसकून तरुणाचा खून; पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एकाच घरात राहणाऱ्या गावाकडील दोघांनी पेट्रोलसाठी (Petrol) ३०० रुपये न दिल्याने चाकूने भोसकून तरुणाचा खून (Murder In Pune) केल्याची घटना वडगाव शेरीत (Vadgaon Sheri Pune) घडली. (Pune Crime)

 

मोहम्मद गुलशाद यामिन अन्सारी Mohammad Gulshad Yamin Ansari (वय २०, रा. अ‍ॅब्रो एंटरप्रायजेस, मुनावर सोसायटी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police) मोहम्मद मुस्तफा अन्सारी (वय २१) आणि सोहेल अन्सारी (Sohail Ansari) यांच्यावर खूनाचा गुन्हा (FIR) दाखल केला असून सोहेल अन्सारी याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत मोहम्मद यामिन अन्सारी (वय २०, रा. मुनावर सोसायटी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५८/२२) दिली आहे. ही घटना वडगाव शेरीतील मुनावर सोसायटीत (Munawar Society) मंगळवारी सायंकाळी ४ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी मोहम्मद अन्सारी व मोहम्मद मुस्तफा अन्सारी (Mohammad Mustafa Ansari) हे मुळचे बिहारचे (Bihar) असून एकत्र राहतात.
फिर्यादी यांचा भाऊ गुलजार व गुलशाद हे पाणीपुरी व्यावसायासाठी लागणारे साहित्याची तयारी घरात करत होते.
त्यावेळी मोहम्मद मुस्तफा अन्सारी हा त्या ठिकाणी आला व त्याने गुलशाद याला गाडीत पेट्रोल भरण्यासाठी ३०० रुपये मागितले.
त्याने पैसे देण्यास नकार दिला.
तेव्हा मोहम्मद मुस्तफा याने मला पैसे का देत नाहीस तुला आता बघतोच असे म्हणून हाताने मारहाण केली.
फिर्यादी हे भांडणे सोडवत असताना आरोपीने घरातील भाजीपाला कापण्याचा चाकू उचलून त्याने गुलशाद याच्या छातीचे खाली खूपसला.
वर्मी घाव बसल्याने त्यात गुलशाद याचा मृत्यु झाला. त्यानंतर सोहेल हा मोहम्मद मुस्तफा याला घेऊन पळून गेला.
चंदननगर पोलिसांनी सोहेल याला पकडले असून पोलीस उपनिरीक्षक पालवे (Sub-Inspector of Police Palve) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A young man was stabbed to death for not paying for petrol; pune wadgaon sheri chandan nagar police station limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 

Kirit Somaiya On Shivsena MP Sanjay Raut | किरीट सोमय्यांचं सूचक ‘Tweet’; म्हणाले – ‘अब संजय राऊत की बारी’

 

ED Summons To Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांना ‘ईडी’कडून पुन्हा समन्स