Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले’ – रावसाहेब दानवे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raosaheb Danve | सध्या राज्यात राजकीय सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे. अशातच शिवसेना आणि भाजप (BJP) यांच्यात देखील टिकाटीपणी होत आहे. यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना दानवे यांनी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

“मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत (NCP-Congress) गेले. जनतेने भाजप-सेनेच्या युतीला कौल दिला होता. पण सेनेने दगा फटका केला,” असं रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी म्हटलं आहे.

 

“शिवसेना आणि भाजपचा विचार एकच आहे, विचारांवर आधारित ही युती होती. 25 वर्ष ही युती राहिली होती.
परंतु ही युती असताना एकत्र विधानसभा, लोकसभा निवडणुका लढलो. जनतेने युतीला कौल दिला होता.
मात्र शिवसेनेने दगाफटका केला. राज्यातील जनतेने दिलेला कौल त्यांनी डावलला, आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली.
ही युती जनतेला मान्य नव्हती या युतीला जनताही कंटाळली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी (CM Eknath Shinde) हा निर्णय घेतला.” असं दानवे म्हणाले.

दरम्यान, “शिंदे गटाने बंड नाही उठाव केलाय. सेना आणि भाजप युती हिंदुत्वाच्या विचारांवर चालत होती.
शिवसेनेतील फुटीसंदर्भात भाजपचा काहीही संबंध नाही,
उलट भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आणि सेनेचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असल्याचं,” दानवे म्हणाले.

 

Web Title :- Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve criticized to uddhav thackeray on shivsena and bjp together

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 

Kirit Somaiya On Shivsena MP Sanjay Raut | किरीट सोमय्यांचं सूचक ‘Tweet’; म्हणाले – ‘अब संजय राऊत की बारी’

 

ED Summons To Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांना ‘ईडी’कडून पुन्हा समन्स