Maharashtra Political News | अजित पवारांचे थेट जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यावर लक्ष, राजकीय संघर्ष आणखी वाढणार!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News |  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अनेक निष्ठावान आणि जुन्या नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली. तर शरद पवारांकडे (NCP Chief Sharad Pawar) अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सहकारी थांबले आहेत. आता अजित पवार गटाकडून ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना (Maharashtra Political News) राज्यातील जिल्हे विभागून दिले आहेत. यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहेत. अजित पवार यांनी स्वत:कडे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यासह, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी घेतली आहे. (Maharashtra Political News)  राष्ट्रवादी एकसंध असतानाही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष लपून राहिलेला नाही. त्यामुळे जयंत पाटील यांना खिंडीत पकडण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न तर सुरु नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी

– अजित पवार – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर
– प्रफुल्ल पटेल (Praful Patel) – भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, नागपूर
– छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) – नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर
– दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) – अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा
– हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) – कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर
– धनंजय मुंडे (Dhananjay Munde) – बीड, परभणी, नांदेड, जालना
– संजय बनसोडे (Sanjay Bansode) – हिंगोली, लातूर, उस्मानाबाद
– अदिती तटकरे (Aditi Tatkare) – रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर
– अनिल पाटील (Anil Patil) –  जळगाव, धुळे, नंदुरबार
– धर्मारावबाबा आत्राम (Dharmarav Baba Atram) – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card Update | सावधान!  आधार कार्ड अपडेटसाठी मोबाईलवर डॉक्युमेंट पाठवणे धोक्याचे: होऊ शकतो स्कॅम