Maharashtra Political News | ‘भावी मुख्यमंत्री’ कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले-‘2024 ची निवडणूक…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. तर दुसरीकडे त्यांच्या सासुरवाडी असलेल्या उस्मानाबाद मध्ये ‘भावी मुख्यमंत्री’ (Future Chief Minister) असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात (Maharashtra Political News) आले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपूरमध्ये ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहे.

फडणवीस आणि अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या (Maharashtra Political News) हालचाली दिल्ली सुरु असल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री (Maharashtra CM) असतील. त्यांच्याच नेतृत्वात निवडणूका लढवल्या जातील, असा मोठा खुलासा फडणवीस यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नागपूरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरबाबत फडणवीस म्हणाले, ज्यांनी कुणी माझे बॅनर लावले असतील, त्यांनी
ते बॅनर काढून टाका. अशा प्रकारचा मुर्खपणा भाजपमध्ये (BJP) तरी करु नका.
मला वाटत नाही, बॅनर लावणारा व्यक्ती भाजपाचा असेल, मात्र काही अतिउत्साही लोक असतात,
आपली बातमी व्हावी, आपलं नाव व्हावं यासाठी अशा प्रकारची बॅनरबाजी करत असतात.

फडणवीस पुढे म्हणाले, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.
2024 च्या निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वात आमचं सरकार निवडणूक लढेल आणि
आम्ही जिंकून दाखवू, असं स्पष्ट विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Web Title :-  Maharashtra Political News | devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset upcoming cm banner in nagpur

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro News | पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा महत्वाचा टप्पा पूर्ण, 2000 सेगमेंटची उभारणी

Maharashtra Political News | मुख्यमंत्री नाराज आहेत का?, देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाच शब्दांत उत्तर, म्हणाले-‘तुम्ही संजय राऊतांना..’

MLA Ravindra Dhangekar | ‘शिंदे-फडणवीसांचा माझ्यावर राग, कारण…’, रविंद्र धंगेकरांचा टोला