Maharashtra Political News | भाजपाच्या महिला खासदाराची नाराजी, म्हणाल्या – ‘फक्त आडनावामुळे डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर…’

जळगाव : Maharashtra Political News | मी १० वर्ष रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) काम केलेले आहे, लोकांशी जनसंपर्क आहे. तुम्ही फक्त खडसे नावामुळे मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचे आहे, अशी नाराजी भाजपाच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) यांनी उघडपणे व्यक्त केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) येथे भाजपा (Maharashtra Political News) अडचणी येण्याची शक्यता आहे.

रक्षा खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांच्या सूनबाई आहेत. खडसे यांनी भाजपांतर्गत नाराजीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपामध्येच राहिलेल्या रक्षा खडसे यांना डावलले जात असल्याची चर्चा होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, खडसे आडनाव आणि इतर स्थितीवरून मी पक्षांतर करणार आहे असा आरोप सातत्याने केला जातो. याआधीही अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केलीय. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असलो तरी त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि माझा पक्ष वेगळा आहे. तुम्ही कुणावर जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही कुठे असले पाहिजे. त्यांचे विचार त्या पक्षाशी जुळतात आणि माझे विचार या पक्षाशी जुळतात म्हणून मी येथे आहे.

रक्षा खडसे म्हणाल्या, महिला म्हणून कशा परिस्थितीत २०१४ ची निवडणूक लढले हे सर्व जगाने पाहिले.
ती लपवण्यासारखी परिस्थिती नव्हती. मी कोणत्या परिस्थितीतून वाटचाल केली ते सर्वांना माहिती आहे.
केवळ खडसेंची सून म्हणून माझी ओळख ठेवली नाही.

ग्राऊंड लेव्हलवर जाऊन काम केले. वैयक्तिक जनसंपर्क वाढवला. रक्षा खडसे नाव लोकांमध्ये पोहचवले.
एखादी महिला कुटुंबाच्या पाठिंब्यावर आणि कुणीतरी तिच्या मागे उभे राहिले तरच पुढे जाऊ शकते ही मानसिकता
बदलली पाहिजे.

खडसे म्हणाल्या, मी पद घेऊन घरात बसले नाही. पदाचा दुरुपयोग केला नाही. मागच्या १० वर्षाच्या कालावधीत
जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहचायचा प्रयत्न केला. तिथल्या अडीअडचणी ऐकून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
पण फक्त खडसे नाव आहे म्हणून माझ्या कामाचा विचार न करता मला बाजूला कसे काढायचे हे चित्र जिल्ह्यात उभे
राहत असेल तर ते चुकीचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bad Habit | या घाणेरड्या व्यसनामुळे वेगाने येऊ शकते वृद्धत्व, कॅन्सर आणि फुफ्फुसाच्या रोगाने होईल मृत्यू!

Pune BJP-Dheeraj Ghate | ‘कंत्राटी पद्धत हे महाविकास आघाडीचे पाप’ – धीरज घाटे