Bad Habit | या घाणेरड्या व्यसनामुळे वेगाने येऊ शकते वृद्धत्व, कॅन्सर आणि फुफ्फुसाच्या रोगाने होईल मृत्यू!

नवी दिल्ली : Bad Habit | जर तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि निरोगी राहायचे असेल तर धूम्रपान सोडा. कारण ते फुफ्फुसांना आणि एकूणच आरोग्याची हानी करते. धुम्रपानामुळे अकाली वृद्धत्व येते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. (Bad Habit)

हे संशोधन ४.७२ लाखांहून अधिक लोकांवर करण्यात आले. इटलीतील मिलान येथील युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये सादर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की धूम्रपान केल्याने इम्युनिटी सिस्टमच्या पांढऱ्या रक्त पेशींमधील क्रोमोसोमच्या शेवटच्या तुकड्याला कमी करते. पेशींची दुरुस्ती होत नाही.

धूम्रपान ही एक अशी सवय आहे जी केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायक ठरते.
हे एक असे व्यसन आहे ज्यापासून मुक्त होणे कठीण आहे, परंतु ते शक्य आहे. धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर, हृदयविकार, स्ट्रोक, डायबिटीज आणि इतर अनेक आजारांचे धोके आहेत. धुम्रपान करणाऱ्यांमध्ये तोंड, घसा आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्यांना श्वास घेण्यात अडचण, खोकला आणि श्वास लागणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. (Bad Habit)

धूम्रपानापासून मुक्त कसे व्हावे

  • एक तारीख ठरवा, जेव्हा तुम्ही धूम्रपान सोडण्यास सुरुवात कराल.
  • तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना सांगा की तुम्ही धूम्रपान सोडत आहात.
  • धूम्रपान सोडण्याची प्लान बनवा.
  • धुम्रपान करावेसे वाटेल तेव्हा इतर एखाद्या कामांमध्ये गुंतून जा.
  • धूम्रपान सोडण्यासाठी मदत घ्या.

धूम्रपान सोडणे कठीण काम आहे, परंतु ते शक्य आहे. जर धूम्रपान सोडण्याचा निर्धार केला असेल तर तुमचे आणि कुटुंबाच्या आरोग्यात सुधारणा करू शकता.

हे देखील वाचा

Pune BJP-Dheeraj Ghate | ‘कंत्राटी पद्धत हे महाविकास आघाडीचे पाप’ – धीरज घाटे

Maratha Reservation | मराठा आरक्षण ओबीसी कोट्यतूनच द्यावे लागणार – ॲड. पुरुषोत्तम खेडेकर