Maharashtra Political News | निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर (Retired IPS officer Pratap Dighavkar) हे आता आपल्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहेत. प्रताप दिघावकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार (Join BJP) असून ते राजकारणात येत आहेत. दिघावकर हे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (Maharashtra Political News)

प्रताप दिघावकर हे काही महिन्यांपूर्वीच पोलीस दलातून (Maharashtra Police) निवृत्त झाले होते. त्यानंतर आता ते राजकारणात एन्ट्री करत आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दिघावकर यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. दिघावकर हे धुळे लोकसभा मतदारसंघातून (Dhule Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Political News)

कोण आहेत प्रताप दिघावकर?

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या (Mumbai 26/11 Terrorist Attack) तपास पथकातील एक महत्त्वाचे अधिकारी होते. सध्या ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य (MPSC) आहेत.
प्रताप दिघावकर यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक (Pune Rural Police SP) पदावर देखील काम केले आहे.
याशिवाय नाशिक परिक्षेत्राचे (Nashik) विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | येरवडा कारागृहात ब्लेड मारुन घेऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune Police MCOCA Action | विक्रांत देवकुळे व त्याच्या इतर 5 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 40 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA