Maharashtra Political News | ‘आदित्यला देखील संजय राऊत चावला की काय?’, शिंदे गटाच्या आमदाराची खोचक टीका

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सतत सरकारवर टीका करत आहेत. आदित्य ठाकरेंकडून होत असलेल्या टिकेवरुन शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मागील आठ दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray Group) काही लोकं बेजबाबदारपणे बोलत आहेत. संजय राऊत ठीक होते, मात्र आता आदित्यला देखील संजय राऊत (Sanjay Raut) चावला की काय? असे म्हणत संजय शिरसाट यांनी खोचक टीका ( Maharashtra Political News) केली आहे.

शिवाजी पार्कवर आमचाच मेळावा

संजय शिरसाट म्हणाले, मिलिटरी आणली तरी आमचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे. संजय राऊत जे काही बोलत आहेत ते बेसलेस आहे. अर्ज दोघांनी केला आहे. ज्याला परवानगी मिळेल त्याचा शिवाजी पार्कवर मेळावा होईल. सिल्व्हर ओकच्या दावणीला बांधलेले काय मेळावा घेणार. आमच्या मेळाव्यातील गर्दी पाहून त्यांची दुकानं बंद होतील, म्हणूनच ते बोलत असल्याचे शिरसाट म्हणाले. ( Maharashtra Political News)

बाळासाहेबांचा एक अंश असता तर…

आदित्य ठाकरे वाघनखांवर प्रश्न उपस्थित करताय, यातून महाराजांच्या बाबतीत त्यांचे विचार दिसतात.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचा उल्लेख बालबुद्धी म्हणून केला आहे.
तर, मी बाळासाहेबांचा वंशज आहे, बाळ नावाचा मला अभिमान असल्याचे म्हणत आहेत. परंतु, बाळासाहेबांचा एक जरी अंश तुमच्यामध्ये असता तर तुम्ही राज्याला दिशा दिली असती. माझ्यामुळे दौरे रद्द झाले असे म्हणणारे आदित्य सध्या भ्रमात जगत असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली.

2 पोलीस गेले तरी संजय राऊत पळून जाईल

शिरसाट पुढे म्हणाले, शिवसेना प्रमुखांचा वारसा आम्ही चालवतोय म्हणून आम्हाला शिवाजी पार्कवर मेळावा घेयचा आहे.
बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत. मात्र, तुम्ही शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याच्या लायकीचे आहात का?
असा प्रश्न आहे. तुम्ही हिंदुत्व शिकवू नका. संजय राऊत यांना सैनिक कशाला हवा दोन पोलीस गेले तरी संजय राऊत
पळून जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | फ्लॅटच्या बाहेर बुटात चावी ठेवणे पडले महागात, पुण्यात चोरट्यांनी घर साफ केलं