Maharashtra Politics | शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना धक्का देण्याची तयारी, श्रीकांत शिंदेंना मिळणार ‘ही’ जबाबदारी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राज्यात राजकीय भूकंप घडवणारे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला शिवसेनेच्या (Shivsena) 40 तर अपक्ष 10 आमदारांसह (MLA) 12 खासदारांनी (MP) साथ दिली. शिंदेंनी बंड केल्यामुळे (Maharashtra Politics) राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेना कोणाची यावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर आपला दावा केला. आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी (National Executive) बनवली. याशिवाय प्रवक्ते, प्रतोद आणि इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास (Maharashtra Politics) सुरुवात केली. याच दरम्यान आता एकनाथ शिंदे याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांना युवासेना प्रमुख (Yuvasena Chief) करावं अशी मागणी करण्यात आली आहे.

 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याने शिवसेना कमकुवत झाली आहे. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी आणि शिवसैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी निष्ठा यात्रा (Nishtha Yatra) काढत महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. यामध्ये आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) मतदारसंघात सभा घेऊन बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नंतर आता उद्धव ठाकरे स्वत: महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) काढत महाराष्ट्र दौरा करणार आहेत. गणेशोत्सव (Ganeshotsav) संपल्यानंतर उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु त्यापुर्वी शिंदे गटाकडून शिवसेनेसह युवासेनेवरही हक्क सांगण्याचा प्रयत्न झाला आहे.

 

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav)
यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन युवासेनेचे प्रमुख म्हणून श्रीकांत शिंदे यांची नेमणूक करावी,
अशी मागणी केली आहे. जाधव आणि शिंदे यांची नंदनवन बंगल्यात बैठक झाली.
या बैठकीनंतर जाधव म्हणाले, शिवसेनेची संघटना आम्ही बांधली.
युवासेनेच्या बाबत लोकांना आवडणारा, युवकांमध्ये रमणारा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांची युवासेना प्रमुखपदी निवड करावी असं त्यांनी सांगितले.
त्यामुळे आता शिंदे गटाचे लक्ष हे युवासेनेच्या प्रमुख पदावर असल्याचे दिसून येते.

 

Web Title :- Maharashtra Politics | cm eknath shinde’s son and mp srikanth shinde will get new responsibility of yuvasena chief shinde group preparing to shock aditya thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याने शिंदे गटाचे टेन्शन वाढलं, लोकसभेची ‘ही’ जागा गमावणार?; राजकीय चर्चेला उधाण

 

Ganeshotsav 2022 | ‘हे गणराया’ बाप्पाचं गाणं श्रोत्यांच्या भेटीस ! शंकर महादेवन यांचा श्रवणीय आवाज

 

Mahlunge-Maan Town Planning Scheme | म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या कामाला गती देण्याचे PMRDA च्या आयुक्तांचे आदेश