Maharashtra Politics | काँग्रेस नेत्याकडून नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना लिहिले पत्र

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे पिता-पुत्राकडून झालेल्या बंडखोरीमुळे काँग्रेस पक्षातील समन्वयाचा अभाव समोर आला. त्यानंतर तांबे पिता-पुत्राचे काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले. पण या सर्व प्रकरणात काँग्रेस पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. त्यात एका नागपुरच्या काँग्रेस नेत्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून राज्यातील नेतृत्व बदलण्याची मागणी केली आहे. (Maharashtra Politics)

माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. डॉ. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या काँग्रेसच्या स्थितीबद्दल भाष्य केले असून यात त्यांनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची प्रमुख मागणी केली आहे.

डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘मल्लिकार्जुन खर्गे यांना संबोधित त्यांनी आपल्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी काँग्रेस पक्ष हा देशातील एक प्रमुख पक्ष होता. तसेच काँग्रेस हा नुसता एक पक्ष नसून तो एक विचार आहे. काँग्रेससारखी मोठी परंपरा कोणत्याही पक्षात नाही. पण हाच मोठा पक्ष आज आपले आस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतोय. आपला महाराष्ट्र पक्ष हा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटलयं.

शेतकरी, कामगार, आदिवासी, युवा वर्ग, महिला, सोशित, पिडीत, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न
व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी आणि महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ
मुद्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने महाराष्ट्राच्या काँग्रेस
अध्यक्षपदाची सुत्रे सोपवली. पण त्यांनी तो विश्वास सपशेल फोल ठरवला.
असा घणाघात डॉ. आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर केला. (Maharashtra Politics)

तसेच,डॉ. सुधीर तांबे यांनी जी बंडखोरी केली. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणुन नाना पटोले हेच जबाबदार आहेत.
ते प्रदेशाध्यक्ष झाल्यारपासून महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहात सुरू आहे.
अशी टीका देखील या पत्रात आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर केली आहे.

Web Title :-  Maharashtra Politics | Congress leader’s demand to oust Nana Patole from the post of Congress state president; A letter written to Congress President Mallikarjun Kharge