Maharashtra Politics | ‘मविआ’ सरकारच्या काळात बंद केलेली ही योजना झाली परत सुरू; या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते सरकारसोबत काम करण्याची संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री फेलोशिप योजना’ (Chief Minister’s Fellowship Scheme) परत सुरू करण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असताना त्यांनी तरूणांना प्रत्यक्ष शासनासोबत काम करता यावे या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरू केली होती. (Maharashtra Politics)

मात्र, राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जानेवारी २०२० मध्ये ही योजना बंद केली. मात्र आता राज्यात परत एकदा भाजप-शिंदे गटाचे सरकार आले आहे. त्यामुळे बंद झालेली ही योजना सत्तेत आल्यानंतर आता परत एकदा सुरू करण्याचा निर्णय भाजप-शिंदे सरकारने घेतला आहे. त्यामुळे शासनासोबत काम करण्याची संधी पुन्हा एकदा राज्यातील तरूणांसाठी खुली करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे येथे आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची (VSI Pune) आज (दि.२१) ४६ वी सर्वसाधारण सभा होती. त्यावेळी आले असता, आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘मागच्या आठवड्यात मकरसंक्रांत झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच गोड गोड बोलायचं आहे. तीनच दिवसांपूर्वी मी दावोसला जाऊन आलो. शरद पवार साहेब अनुभवी आहे, त्यांना माहिती आहे. कुणी काही म्हटलं तरी सुद्धा तिथून आपल्या राज्यासाठी भरपूर गुंतवणूक आणली आहे.’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला. (Maharashtra Politics)

राज्यातील सत्तातरणाच्या नाट्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे एकाच व्यासपीठावर आले.
पुण्यातील मांजरीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (VSI Pune) ४६ व्या सर्वसाधारण सभेचं आयोजन
करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली.

Web Title :-Maharashtra Politics | devednra fadanvis chief ministers fellowship scheme will be started again

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Sachin Ahir | ‘पीएला त्यांनी जी पदं दिली, आज त्याच पदावर त्यांना समाधान मानावे लागत आहे’; ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची विजय शिवतारे यांच्यावर टीका