Maharashtra Politics | दिपाली सय्यद यांना किशोरी पेडणेकरांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या – ‘ठाकरेंवर टीका केली की शिंदे गटात मोठे पद मिळते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेतील बंडखोरीनंतर (Rebellion in Shiv Sena) शिंदे-ठाकरे यांच्यात समेट घडवण्यासाठी धाव घेणार्‍या शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांचा कल शिंदे गटाकडे (Shinde Group) कधी वाढला ते समजलेच नाही. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी (Maharashtra Politics) बोलताना थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरच टीका केली होती. ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली होती. सय्यद यांच्या टीकेला आता शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

 

काल दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले. यानंतर त्या म्हणाल्या, मी शिंदे गटात जाणार की नाही ते लवकरच समजेल. मात्र लोकांची तशी इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यभर (Maharashtra Politics) दौरा करायला हवा होता. त्यांना भेटण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागायची. त्यांच्या बाजूची चार माणसे आमचा संदेश उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नव्हते.

 

दरम्यान, सय्यद यांना प्रत्युत्तर देताना किशोरी पडणेकर यांनी म्हटले की, दीपाली सय्यद यांनी कोणाला भेटावे का भेटावे? हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये एक स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी जेवढे चुकीचे मत व्यक्त कराल तेवढे मोठे पद मिळेल, असा प्रकार सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की इप्सित साध्य होते. त्यामुळे दीपाली सय्यद असो किंवा अन्य कोणी, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना काल दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या की, त्यांनी अगोदरच या दौर्‍यांना सुरुवात करायला हवी होती.
माझे पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे.
उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर शिवसेना पक्षात फूट पडली नसती.
माझा आवाज मातोश्री पर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच लोक होते. आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगेन.
काही काम करायचे असेल तर आता आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो.
आम्ही ते काम मुख्यमंत्र्यांना सांगतो. त्याची पुढे अंमलबजावणीही होते. ते खूप महत्त्वाचे आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | kishori pednekar replied to deepali sayyed over criticism shivsena uddhav balasaheb thackeray group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Politics | शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट! शिंदे गटातील 22 नाराज आमदार भाजपात विलीन होणार