Maharashtra  Political Crisis |  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी, आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra  Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज (गुरुवार) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वतीने कपिल सिब्बल (Kapil Sibal), अभिषेक मनु संघवी (Abhishek manu Singhvi) तर शिंदे गटाच्या (CM Eknath shinde) वतीने हरीश साळवे (Harish Salve) यांनी युक्तीवाद केला. तर निवडणूक आयोगाच्या (Election Commission) वतीने अरविंद दातार (Arvind Datar) यांनी युक्तिवाद केला. कालच्या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना (Shiv Sena) कोणाची यावर येऊन पोहचली होती. यावर आज कोर्टात महत्त्वाचा निर्णय दिला. पक्षाच्या चिन्हासंदर्भात कोणताही निर्णय नको, असे आदेश सुप्रीम कोर्टाने आयोगाला (Maharashtra Politics Crisis) दिले आहेत. दरम्यान आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी 8 ऑगस्टला होणार आहे.

आजच्या सुनावणी मधील महत्त्वाचे मुद्दे

1. सुप्रीम कोर्टात 11 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. शिंदे गटाकडून हरीश साळवेंचा युक्तिवाद, पक्षविरोधी काम करताहेत या स्वत:च्या धारणेवरुन सदस्यांना अपात्र ठरवू शकतात का? असा सवाल साळवेंनी उपस्थित केला. (Maharashtra Political Crisis)

2. पक्षांतर बंदी कायदा (Defection Prohibition Act) पक्षांतर्गत मतभेदांशी निगडीत नाही, हरीश साळवेंचा युक्तिवाद, यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, मग व्हिपचा अर्थ काय?

3. राजकीय पक्षाला आपण पूर्णपणे दुर्लक्षित करु शकत नाही, सरन्यायाधीशांचे (Chief Justice) मत तर बंडखोरांनी पक्ष सोडलेला नाही, असा युक्तिवाद (Argument) हरीष साळवे यांनी केला. पात्रतेच्या निर्णयाला विलंब झाल्यास आतापर्यंतच्या निर्णयाचं काय? अध्यक्षांविरोधात आवाज उठवणं नवीन नाही, हरीष साळवेंच्या युक्तिवादावर राजकीय प्रश्न असल्याने निवडणूक आयोगाला कसं रोखू शकतो? असा सवाल कोर्टाने केला.

4. आमच्यासाठी बंडखोर आमदार अपात्र (MLA Disqualified), अपात्र ठरलेले लोक आयोगाकडे जाऊ शकत नाही, ठाकरे गटाकडून सिब्बिल यांचा युक्तिवाद, दोन गट मूळ पक्षाचा असल्याचा दावा करु शकत नाहीत का? कोर्टाचा सवाल

5. बंडखोरांकडून राजकीय पक्ष (Political Parties) आणि विधिमंडळ पक्ष (Legislative Parties) यामध्ये गल्लत केली जात असल्याचा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.

6. दहावी सूची आणि आयोगाचं कार्यक्षेत्र वेगळं, विधिमंडळातील घडामोडींचा राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाशी संबंध नाही, निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांनी युक्तिवाद केला.

7. दहावी सूची निवडणूक आयोगाला लागू होत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था, निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांचा युक्तिवाद केला.

8. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश, आजची सुनावणी संपली. पुढील सुनावणी सोमवारी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी होईल. सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, याचिका मोठा खंडपीठाकडे सोपवायची का याबाबत सोमवारी निर्णय घेऊ असे कोर्टाने सांगितले.

Web Title :- Maharashtra Politics | maharashtra politics supreme court direct to election commission of india dont take any decision on shivsena election symbol

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली! उद्या होणार राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? ही नावं निश्चित

Maharashtra Politics | शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना