Maharashtra Politics News | ठाकरे गटातून आऊटगोईंग सुरुच, बडा नेता शिंदे गटात प्रवेश करणार?, शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेना ठाकरे गटातून (Shiv Sena Thackeray Group) शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणाऱ्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटला मोठा धक्का बसला. आज आणखी एक धक्का बसणार असल्याचे सूचक ट्विट शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केले आहे. आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार असं म्हस्के यांनी (Maharashtra Politics News) ट्विटमध्ये म्हटले आहे.

नरेश म्हस्के यांनी नेमकं काय म्हटलं?

नरेश म्हस्के यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणारा नेता कोण, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. नरेश म्हस्के यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होईल. खऱ्या शिवसेनेत येऊन विचारांशी निष्ठा ठेवील. नाहीच राहू शकत तिथे खरे कार्यकर्ते, आता स्मशान शांतता पसरणार तिकडे, मारोत कुणी काही बाता, सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार, ‘उठा’ तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार, ED चा फेरा ठेपलाच आहे, येऊन तुमच्या दारी, म्यान करून ठेवा तुमच्या गंजल्या तलवारी, आशा आशयाचं ट्विट नरेश म्हस्के यांनी केलं आहे.

ट्विटला बीएमसीचा फोटो

नरेश म्हस्के यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला आहे. म्हस्के यांनी खरा कार्यकर्ता हा कधीही ठाकरे गटासोबत राहू शकत नाही, अशा आशयाची एक कविता ट्विट करताना मुंबई महानगरपालिकेचा (Mumbai Municipal Corporation (BMC) फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे मुंबईतील ठाकरे गटाचा कोणता नेता आता शिंदे गटात जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title :  Maharashtra Politics News | another leader from the thackeray group will join the shiv sena shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा