Maharashtra Politics News | BSR पक्षाकडून पंकजा मुंडेंना मुख्यमंत्र्याची ऑफर, सुधीर मुनगंटीवार यांची सूचक प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics News) भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) अर्थात बीएसआर (BSR) पक्षाने एन्ट्री केली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पक्षातील आजी-माजी नते सध्या बीएसआर पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrasekhar Rao) यांनी हा पक्ष राजकारणात आणला असून वेगवेगळ्या राज्यात तो पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Maharashtra Politics News) बीएसआर पक्षाने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. यासंदर्भात भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बीएसआर पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाईत आहे. परंतु महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये बीएसआरचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. हैदराबाद महापालिकेत (Hyderabad Municipal Corporation) भाजप 3 वरुन 50 पर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रभक्त-देशभक्त मतदार तुष्टीकरणाची नीती चालू देणार नाही. (Maharashtra Politics News) बीएसआरने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार आहे. पंकजा मुंडे राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. ते या ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत, असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.

मात्र भावी मुख्यमंत्र्यांनी आपल्या…

महाराष्ट्रात सध्या दहापेक्षा जास्त मुख्यमंत्री स्वत:ला प्रोजेक्ट करत आहेत. दहाच काय राज्यात शंभर मुख्यमंत्री असावेत. स्वप्न पाहण्याला घटनेत कुठलीही मनाई नाही. मात्र या सर्व भावी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनात काय आहे हे बॅनरद्वारे सांगावे. यासोबतच या सर्वांनी मनात स्थान निर्माण करावे हे महत्त्वाचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

ठाकरे सोनिया सेनेचे सदस्य

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य झाले आहेत.
मेहबूबा मुफ्ती यांच्या बाजूला बसून त्यांनी हे दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींपुढे (Sonia Gandhi)
हिंदुत्वाचे समर्पण केले. देश असो वा राज्य उद्धव ठाकरे यांची अवस्था दारुण झाली आहे, अशी टीका मुनगंटीवार
यांनी केली. तसेच विरोधकांची पाटणा येथील एकजुटीची बैठक म्हणजे कुठलाही विचार नसलेली गोष्ट आहे.
ही बैठक म्हणजे इंजिन विना गाडी आणि आत्म्या विना शरीर असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला.

Web Title : Maharashtra Politics News | bjp sudhir mungantiwar reaction over brs offer pankaja munde of cm post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा