Maharashtra Politics News | अजित पवारांसोबत 40 आमदार, भाजपचा दावा; ‘हे’ 9 आमदार शपथ घेणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहेत. राज्यपालांना भेटून त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आजच मंत्रिमंडळाचा (Maharashtra Politics News) दुसरा शपथविधी होणार असून राजभवनात तशी तयारी सुरु झाली आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार MLA) आणि दोन खासदार (MP) राजभवनात दाखल झाले आहेत.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येणार आहे. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आदिती तटकरे (Aditi Tatkare), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil), बाबुराव अत्राम (Baburao Atram), संजय बनसोडे (Sanjay Bansode), नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Politics News)

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि 40 पेक्षा अधिक आमदार देशासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकत्र येत असतील तर ते महत्त्वाचं आहे. मोदींनी जो संकल्प केला आहे त्याला साथ देण्यासाठी अजित पवार आणि सर्व लोक आले आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो, असे बावनकुळे म्हणाले.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | chandrashekhar bawankule first reaction on ajit pawar joining shinde fadnavis government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा