Maharashtra Politics News | ‘राज ठाकरे आणि नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही ऑफर होती, मात्र…’, ठाकरेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची दोन दिवसांपूर्वी शिवसेना वर्धापन दिनानिमत्त जाहिर सभा झाली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) जोरदार टीका केली. (Maharashtra Politics News) पुन्हा एकदा ते या आमदारांना गद्दार म्हणाले. शिवसेना सोडण्यासाठी खोके घेतल्याचा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदे, दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, त्यांच्याकडे बोलायला आता दोनच मुद्दे आहेत, एक गद्दार आणि दुसरा खोके. ठिक आहे, परंतु 35 वर्ष आम्ही तिथेच घासली आहेत. त्यांनी आमचा पूर्वीचा इतिहास तपासावा. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून कामं केली. गद्दारी करायची असती तर नारायण राणेंनी (Narayan Rane) शिवसेना सोडली त्याचवेळी केली असती. मी आमदार होतो आणि त्यावेळीही आम्हाला ऑफर होती. राज ठाकरे (Raj Thackeray) गेले तेव्हाही गद्दारी करु शकलो असतो, मात्र आम्ही तसं केलं नाही. (Maharashtra Politics News)

उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही

यावेळी मात्र विचारांचा विषय आला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray) यांनी बांधलेली शिवसेना लयाला जातेय असं वाटू लागलं होतं. सुरुवातीला जेव्हा काही आमदार तिकडे गेले, तेव्हा आम्ही सांगून सुद्धा उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही. कोणीतरी एखादा तीनपाट माणूस त्यांना सल्ले देत होता आणि ते त्याचं ऐकत होते. मी तर 33 नंबरला गेलो ना? मी त्यांना सांगून गेलो, असे गुलाबराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या खोकेबहाद्दर या टीकेला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं.
ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आमच्या पक्षाला मान्यता दिली आहे.
त्यामुळे तुम्ही आम्हाला खोके बोलणारे कोण? तुमचं तिकडे काँग्रेसशी आय लव्ह यू सुरु आहे. त्यावर बोला.

Web Title :  Maharashtra Politics News | gulabrao patil says when narayan rane left shivsena we had an offer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा