Maharashtra Politics News | शिंदे गटासोबतच्या वादानंतर भाजपचा कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | डोंबिवलीमधील भाजपचे (Dombivli BJP) पदाधिकारी नंदू जोशी (Nandu Joshi BJP) यांच्यावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Eknath Shinde) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. भाजपच्या नेत्यांनी आज ठाण्यात झालेल्या मेळाव्यात आक्रमक भूमिका घेत ठाणे (Thane Lok Sabha Constituency) आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर (Kalyan Lok Sabha Constituency) दावा केला आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ आपले होते आणि यापुढेही राहतील असा दावा करताच मेळाव्याला (Maharashtra Politics News) उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.

 

मोदी सरकारच्या (Modi Government) नऊ वर्षात राबवलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी भाजपने रविवारी ठाणे लोकसभा मतदारसंघात मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना आमदार संजय केळकर (MLA Sanjay Kelkar) यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील असा दावा केला. त्यावर उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी घोषणाबाजी करत प्रतिसाद दिला. (Maharashtra Politics News)

 

श्रीकांत शिंदेंना टोला

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असा आव काही जण आणत आहेत. अशा फुकटच्या वलग्ना करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या योजना राबवा, असा टोला केळकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला. तसेच भाजपशिवाय या जिल्ह्यातून कोणीही निवडून जाऊ शकणार नाही, असाही दावा केळकर यांनी केला.

 

ठाणे भाजपचा बालेकिल्ला

ठाणे लोकसभा मतदारसंघ काही कठीण नाही, या ठिकाणी संघटनात्मक प्रचंड ताकद असून येथे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
त्यामुळे आपल्या विरोधकांना दाखवून द्यायचं आहे की, ठाणे जिल्हा हा पूर्वीपासून ते आजपर्यंत भाजपचा आहे,
असे सांगत केळकर यांनी ठाणे भाजपचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले.

 

Web Title :  Maharashtra Politics News | Maharashtra bjp claim on thane and
kalyan loksabha constituency after dispute with shivsena shinde faction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा