Pune Crime News | कात्रज-आंबेगाव पठार परिसरातून अफिमचा मोठा साठा जप्त ! गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक-1 ने (Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) कात्रज-आंबेगाव पठार (Katraj – Ambegaon Pathar) परिसरात अफिमची ( Afim Distributor) विक्री करणार्‍या एकाला अटक केली असून त्याच्याकडील तब्बल 8 लाख 34 हजार 900 रूपये किंमतीचे 417 ग्रॅम 450 मिलीग्रॅम अफिम आणि इतर ऐवज असा एकुण 13 लाख 78 हजार 950 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)

जितेंद्र देवीलाल शर्मा Jitendra Devilal Sharma (38, मुळ रा. मु.पो. चाबा, ता. शेरगड, जि. जोधपूर, राजस्थान. सध्या रा. गुरूदत्त कॉलनी, प्रेरणा शाळेजवळ, आंबेगाव पठार, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 9 जून 2023 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1 मधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. (Pune Crime News)

आंबेगाव पठार येथील स्वामीनगरमधील तापकिर एसटीडी जवळील सार्वजनिक रस्त्यावर एकजण अफिमची विक्री (Drugs Distributor) करीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार पांडुरंग पवार आणि सचिन माळवे यांना मिळाली. त्यांनी त्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad) यांना कळविले. त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिल्या.

पोलिस पथकाने सापळा रचुन जितेंद्र देवीलाल शर्मा याला अटक केली. त्याच्या ताब्यातील 417 ग्रॅम 450 मिलीग्रॅम वजनाचे 8 लाख 34 हजार 900 रूपये किंमतीचे अफिम, 5 लाख रूपये किंमतीची मारूती सुझुकी एरटिका, मोबाईल, होंडा अ‍ॅक्टीव्हा असा एकुण 13 लाख 78 हजार 950 रूपयाचा ऐवज जप्त केले आहे. जितेंद्र शर्मा याच्याविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार
(ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड,
सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dengle),
पोलिस अंमलदार मारूती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार,
संदिप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख आणि योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title : Pune Crime News | Large stock of opium seized from Katraj-Ambegaon Pathar area! One person was arrested by the Anti-Narcotics Squad of the Crime Branch


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा