Maharashtra Politics News | पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले, भगीरथ भालकेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | बीआरएस पक्षाचे (BRS Party) अध्यक्ष आणि तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) अर्थात के चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrasekhar Rao) हे सोलापूर, पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केल्याची टीका राजकीय वर्तुळात केली जात आहे. केसीआर यांनी आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. (Maharashtra Politics News) या सभेत भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात बोलताना भालके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

भगीरथ भालके म्हणाले, माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या मतदारसंघात लक्ष देण्याची गरज असताना शरद पवार यांनी दुर्लक्ष केलं. मला कोणतीही मदत केली नाही असे सांगतानाच भालके यांनी राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांना टोमणा मारला. पोपटपंची करणाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना माझ्या विरोधात उभे केले. मी आता शांत बसणार नाही. माझी ताकद दाखवणार, अशी टीका भगीरथ भालके यांनी केली. (Maharashtra Politics News)

सरकोली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याला केसीआर यांच्यासह बीआरएस पक्षाचे 32 मंत्री व 87 आमदार उपस्थित होते. या मेळाव्यात माजी आमदार कै. भारत भालके (Former Late MLA Bharat Bhalke) यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षाच जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थित शेतकरी आणि समर्थकांनी टाळ्या वाजवून भालकेंना प्रतिसाद दिला.

शेतकरी मेळाव्यात बोलताना केसीआर म्हणाले, महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेत बीआरएस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. बीआरएस पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष आहे. बीआरएस पक्ष सत्तेत आल्यास भगीरथ भालके यांना मंत्रिपद देऊ. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाईल, असे केसीआर यांनी सांगितले.

Web Title : Maharashtra Politics News | NCP chief sharad pawar pitted those who did talk against me allegation of bhagirath bhalke in front of brs kcr solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा