Maharashtra Politics News | अजित पवारांच्या नव्या मंत्र्यांना बंगल्यांचं आणि दालनाचं वाटप,कुणाला कोणता बंगला?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी 8 आमदारांसह सहभागी झाले. अजित पवार गटाच्या मंत्र्यांना कोणती खाते मिळणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांना मंत्रालयात दालन (Cabin) आणि शासकीय बंगल्याचे (Bungalow) वाटप करण्यात आले. परंतु अजित पवार यांच्याबद्दल अद्याप निर्णय गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. (Maharashtra Politics News)

 

सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं गेलं. पण त्यांना कुठलं खातं मिळणार यापेक्षा जास्त अजित पवार मंत्रालयात (Ministry) कुठं बसणार? त्यांना सहाव्या मजल्यावर कार्यालय मिळणार की दुसऱ्या कुठल्या मजल्यावर? याबाबत आता शासन आणि प्रशासनाकडून चर्चा सुरु आहे. अशातच इतर मंत्र्यांना मंत्रालयामध्ये दालन आणि शासकीय निवास्थानाचे वाटप करण्यात आले आहे. (Maharashtra Politics News)

 

नव्या मंत्र्यांची दालनं

1. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) – 201 नंबर दालन दुसरा मजला
2. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) – 407 नंबरचे दालन, 4 मजला
3. दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) – 303 नंबर दालन, तिसरा मजला
4. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) – 201 ते 204 आणि 212 नंबरचे दालन, मंत्री मंत्रालय विस्तार इमारत, दुसरा मजला
5. धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) – 601,602 व 604, मंत्री मंत्रालय विस्तार इमारत, सहावा मजला
6. आदिती तटकरे (Aditi Tatkare) – दालन नंबर 103, मुख्य इमारत पहिला मजला
7. अनिल पाटील (Anil Patil) – दालन नंबर 401, 4 था मजला, मुख्य मंत्रालय इमारत
8. संजय बनसोडे (Sanjay Bansode) – दालन नंबर 301, मुख्य मंत्रालय इमारत तिसरा मजला

 

कोणत्या मंत्र्यांना कोणते बंगले?

1. छगन चंद्रकांत भुजबळ, मा. मंत्री ब-6 (सिध्दगड-Sidhgarh)
2. हसन मियालाल मुश्रीफ, मा.मंत्री क-8 (विशाळगड-Vishalgad)
3. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, मा.मंत्री क-1 (सुवर्णगड-Suvarnagad )
4. धनंजय पंडितराव मुंडे, मा. मंत्री क-6 (प्रचितगड-Prachitgad)
5. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, मा.मंत्री सुरुची-3 (Suruchi)
6. अनिल भाईदास पाटील, मा.मंत्री सुरुची-8
7. संजय बाबुराव बनसोडे, मा.मंत्री सुरुची-18

मंत्र्यांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, यामध्ये आदिती तटकरे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंगळवारी (दि.11) हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. संबंधित निवासस्थाने त्या ठिकाणी राहणाऱ्या मंत्र्यांनी (रहत असल्यास) येत्या 15 दिवसांच्या आत वाटप करण्यात आलेल्या मंत्र्यांसाठी रिकामे करुन देण्याचा उल्लेख शासन निर्णयात नमूद केला आहे.

 

Web Title : Maharashtra Politics News | ncp leader hasan mushrif and chhagan bhujbal along with 8 people got office in mantralaya mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rashmika Mandanna | रश्मिकासोबत फोटो काढताना फॅनने अचानक घेतला फोन हिसकावून; व्हिडिओ व्हायरल

Kriti Sanon | “तुझे लग्न होणार नाही..”, अभिनेत्री क्रिती सेनॉनने सांगितले बॉलीवुडच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव, स्टार किड्समुळे…