Rashmika Mandanna | रश्मिकासोबत फोटो काढताना फॅनने अचानक घेतला फोन हिसकावून; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हि देशाची क्रश म्हणून ओळखली जाते. तिच्या निखळ हास्यावर व जबरदस्त अभिनय कौशल्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग आहे. रश्मिका आता फक्त दाक्षिणात्य सिने विश्वामध्ये नाही तर बॉलीवुडमध्येही (Bollywood News) काम करत आहे. रश्मिका (Rashmika Mandanna) नेहमी तिच्या चाहत्यांसोबत नम्रपणे वागताना दिसते. रश्मिकाची अशी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये फॅन रश्मिकाच्या हातातून फोन हिसकावून घेत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना ही तिच्या फॅन मोमेंट नेहमी एन्जॉय करते. ती नेहमी फॅन्सला फोटो व सेल्फी काढून देते. या दरम्यान तिची एक व्हिडिओ व्हायरल झाली आहे. यामध्ये रश्मिका व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर जमा झालेल्या फॅन्सला फोटो देत होती. (Rashmika Fan Moment) यावेळी रश्मिकाने सुंदर असा काळ्या रंगाचा ड्रेस सुट परिधान केला आहे. व केस मोकळे सोडून लूक पूर्ण केला आहे. (Rashmika Photo) यावेळी अनेक चाहते रश्मिकाचे फोटो काढत होते. यावेळीच एका फॅनने रश्मिकाच्या हातात मोबाईल दिला. मात्र दुसऱ्याने तो रश्मिकाच्या हातातून हिसकावून काढून घेतला. यामुळे अभिनेत्री रश्मिका देखील अचानक शॉक झाली. अभिनेत्री रश्मिकाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही मनोरंजन विश्वात यशाच्या शिखरावर आहे.
तिचा मोठा चाहता वर्ग असून ते रश्मिकाच्या आगामी चित्रपटाबाबत उत्सुक असतात. (Rashmika Mandanna Movie) सध्या
रश्मिका तिच्या ‘पुष्पा 2: द रूल’ (Pushpa 2: The Rule) या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
तसेच अभिनेत्री रश्मिका हिने बॉलीवुडमध्येही (Rashmika Bollywood Movie) एन्ट्री केली असून तिचा लवकरच ‘अॅनिमल’
(Animal) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Web Title :   Rashmika Mandanna | rashmika mandanna left shocked as fan snatches phone from her hand video goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून घरफोडी करणार्‍याला अटक, डान्सरच्या घरावर मारला होता डल्ला, पोलिसांकडून 12 लाखाचा ऐवज जप्त

Uday Samant on Uddhav Thackeray | ‘हॉस्पिटलमध्येच किती मीटींग झाल्या, मला पण सांगवं लागेल…’, उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Pune PMC – JICA project | ऍग्रीकल्चर कॉलेजने जागा न दिल्याने जायका प्रकल्पातील एका एसटीपीचे काम रखडले