Maharashtra Politics News | शिंदेंच्या शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरेंकडे सोपवण्याची भाजपाची रणनीती?, पण आमदार, खासदारांचा विरोध

मुंबई : Maharashtra Politics News | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी नुकतीच दिल्लीत भाजपा नेते (BJP Leader) अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत (Mahayuti) सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ठाकरे-शाह यांची भेट झाल्यानंतर (Shah-Thackeray Meeting) मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बैठक झाली होती. या घामोडींमागे भाजपाची मोठी रणनीती असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. (Maharashtra Politics News)

ठाकरे-शाह भेट तसेच मुंबईतील ताज लँडमधील चर्चा केवळ मनसेला महायुतीत घेण्यापुरती मर्यादित नव्हती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मनसे विलीन करायची आणि प्रमुखपद राज ठाकरे यांना देण्याचा प्रस्ताव मनसेला या बैठकीत देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे, असे वृत्त या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

या वृत्तात असेही म्हटले आहे की, या निर्णयाला शिवसेना शिंदे गटातील आमदार खासदारांनी जोरदार विरोध केला आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले की, मी सध्या सांगोल्यात आहेत. मला अशाप्रकारच्या प्रस्तावाबाबत कुठलीही माहिती नाही. त्यात मी अज्ञानी आहे.

परंतु आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेंच राहिले पाहिजे. त्यात आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही.
त्यात काही असेल त्याला आम्ही नकार देऊ. असे अजिबात चालणार नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो,
असे शहाजीबापु पाटील यांनी म्हटले.

तर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले की, असा कोणताही विषय नाही.
सध्यातरी माझ्यापर्यंत असा विषय आलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपाचे वरिष्ठ नेते,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करत आहेत. मनसेला महायुतीत सहभागी करून
घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. समविचारी पक्ष असल्यामुळे मनसे सोबत आली पाहिजे, अशी आमचीही भावना आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जमीन विकसनासाठी देण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाची 50 लाखांची फसवणूक

Pune Political News | ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात रंगली राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र (Video)

Baramati Lok Sabha | ”दुसरीकडे बटन दाबलं तर चैन पडेल का रात्री, आपल्या लेकीला…”, अजित पवारांच्या वहिनींचे सुप्रिया सुळेंसाठी आवाहन

Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली – अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील