Maharashtra Politics News | फडणवीसांना फक्त सरकार पाडायची माहिती, शिंदे मुख्यमंत्री होणार हे एक महिना आधीच ठरलं होतं; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फक्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार पाडायची माहिती होती, पण शिंदेच मुख्यमंत्री होणार हे एक महिना आधीच ठरलं होतं, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी केला आहे. शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath shinde) होणार हे फक्त एकनाथ शिंदे आणि अमित शाह (Amit Shah) यांनाच माहिती होतं. एकनाथ शिंदे यांनी तसं सत्तांतराच्या महिनाभर आधीच सांगितलं होतं असंही ते म्हणाले. (Maharashtra Politics News) ठाकरे गटाच्या ‘आवाज कुणाचा’ या कार्यक्रमात आमदार नितीन देशमुख आणि आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी अनेक गैप्यस्फोट केले.

 

सत्तांतराच्या हालचाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच सहा सात महिन्यांनी सुरु झाल्या होत्या. त्यावेळी आम्हाला त्याची कुणकुण लागली होती, (Maharashtra Politics News) पण गेले तर 20-22 आमदार फुटून जातील असं वाटत होतं. त्याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही, सत्तांतर होणार नाही असं वाटत होतं, असं नितीन देशमुख म्हणाले.

 

नितीन देशमुख म्हणाले की, शिंदे गटातील जे वरिष्ठ नेते आहेत ते सगळे आधीपासून एकत्र होते. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) सांगतात आम्ही नंतर एकनाथ शिंदे सोबत गेलो. मात्र तसं नाही, हे सर्व सीनियर लीडर्स आधीपासून एकत्र होते आणि शेवटी ते शिंदेकडे आले असं त्यांनी दाखवलं. ते आधीपासून सगळे सोबत होते. एकनाथ शिंदे सोबत नंतरची नेत्यांची टीम आली त्यातील ज्येष्ठ नेतेच या सगळ्या सत्तांतराची सूत्रधार होते.

सत्तांतर होण्याच्या एक महिने आधी आम्हाला माहीत होतं शिंदे मुख्यमंत्री होणार.
ते स्वत: मला ते म्हणाले होते मुख्यमंत्री मी असणार असा गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला आहे.
ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना फक्त सत्ता पाडायची माहिती होती.
मात्र मुख्यमंत्री शिंदे होणार हे फक्त शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माहित होतं.
आम्हाला प्रत्येकाला वेगळे वेगळे काहीतरी सांगितलं जात होतं.

नितीन देशमुख म्हणाले, दीड दोन वर्षापासून या सगळ्याचा सापळा रचला जात होता.
कधी वाटलं नाही एवढे आमदार त्यांच्यासोबत जातील. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचा हिंदुत्वाशी संबंध काय आणि
हे म्हणतात बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत.
माझ्या जिल्ह्यात तर देवेंद्र फडणवीस कधी दिसले नाहीत. जिल्ह्यात दंगली झाल्या,
महिलांवर अत्याचार झाले तरी फडणवीस आले नाहीत. ते फक्त सभेसाठी येतात.

 

Web Title : Maharashtra Politics News | shivsena nitin deshmukh on eknath shinde uddhav thackeray devendra fadanvis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा