Maharashtra Politics News | ‘अजित दादांना बोलून दाखवावं लागलं, हे दुर्दैवी’, भाजपचा राष्ट्रवादीला टोला (व्हिडिओ)

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते (Opposition Leader) अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्षाकडे मोठी मागणी केली होती. आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नाही, या जबाबदारीतून मला मुक्त करा अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. (Maharashtra Politics News) यावर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, अजित दादा हे त्यांच्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक अनेक वेळा मंत्रिमंडळामध्ये (Cabinet) दाखवली आहे. त्यांना पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवावी लागणे हे दुर्दैवी असल्याचा टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी (दि.24) बारामतीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे पुढे म्हणाले, राष्ट्रवादीमधील नाट्यमय घडामोडीनंतर मला असे वाटले होते की अजित पवार व छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडतील. (Maharashtra Politics News) मात्र, त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले. राष्ट्रवादीमध्ये ज्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. त्या केवळ मीडियाची स्पेस घेण्यासाठी व महाराष्ट्राला भूलथापा देण्यासाठी आहे. त्यामुळे तिथे भाकरी फिरवण्याची कोणालाही इच्छा नाही.

उद्धव ठाकरेंना आव्हान

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना माझे आव्हान आहे. तुम्ही विधान मंडळाचे (Legislative Council) सदस्य आहात. विधान मंडळात तुम्ही पीएम केअर फंडाबाबत (PM Care Fund) आवाज उठवावा. मागील अधिवेशनामध्ये तुम्ही काही बोलला नाही. तुम्ही एकच दिवस अधिवेशनामध्ये आला. तुम्हाला ठाणे नागपूर येथील महापौरांचा भ्रष्टाचार माहिती आहे. तर अधिवेशनामध्ये येऊन तुम्ही ते मांडायला पाहिजे. सरकार त्याची चौकशी करेल. परंतु, तुम्ही अधिवेशनामध्ये येणारच नाही. तुमच्या लेटर पॅडवर हे सरकारला सांगा ना, का नुसत्या तोंडाच्या वाफा फेकायच्या. तुमच्यात जर हिम्मत असेल तर विरोधी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही हा भ्रष्टाचार समोर मांडा. जर काही चुकीचे असेल तर सरकार त्याच्यावर कारवाई करेल.

पंकजा मुंडेंच्या रक्तात फक्त कमळ

पंकजाताई (Pankaja Munde) या गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या सावलीमध्ये वाढल्या आहेत.
त्यांच्या रक्तारक्तामध्ये कमळ आहे. त्या कधीही बीआरएस (BRS) किंवा एमआयएम (MIM) या पक्षांचा
विचार देखील करु शकत नाहीत. हा महाराष्ट्र समजायला भाजपला (BJP) 40 वर्ष लागली.
पवार साहेबांना 84 वर्ष लागली. त्यामुळे बाहेरचा कोणीतरी येणार आणि मी हे करेल ते करेल असं सांगत असेल तर ते होणार नाही. कोणी बीआरएस आणि एमआयएम पंकजाताई यांच्याकडे जात असेल तर त्या दारात देखील घेणार नाहीत, असं चंद्रशेखर बावनकुले यांनी सांगितले.

Web Title : Maharashtra Politics News | this is ajit pawar misfortune chandrasekhar bawankules advice to ncp leaders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा