Maharashtra Politics News | ‘तुम्हाला पदं भाजपमुळे…’, भाजप नेत्याने उदय सामंत, दादा भुसेंना सुनावलं (व्हिडिओ)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सारंकाही आलबेल असल्याचे दाखवण्यात येत असताना आता शिंदे गटातील (Shinde Group) आणि भाजप (BJP) नेत्यांमधील कुरबुरी समोर येत आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आठवण करुन देतो की, त्यांची पदं भारतीय जनता पक्षामुळे (Maharashtra Politics News) आहेत, अशा शब्दात भाजपचे सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण (Co-Chief Spokesperson Ajit Chavan) यांनी भुसे आणि सामंत यांना सुनावलं आहे.

 

याबाबत अजित चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण (Maharashtra Politics News) आले आहे. राज्यात सध्या शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि भाजपचं सरकार आहे. परंतु हे सर्व भाजपच्या पाठिंब्यावर असल्याची आठवण अजित चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्र्यांना करुन दिली आहे. या घटनेमुळे शिवसेना-भाजपमध्ये कुरबुरी चव्हाट्यावर आली आहे.

 

 

 

 

नाशिकच्या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घटन वेळी उद्योगमंत्री उदय सावंत आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या सोबत भाजप आमदार सीमा हिरे (BJP MLA Seema Hire) याही उपस्थित होत्या. मात्र, यावेळी रिबीन कापताना एका व्यक्तीचा सीमा हिरेंना धक्का लागला आणि त्या खाली पडल्या. महिला आमदार खाली पडल्यानंतरही दोन्ही मंत्र्यांनी साधी दखलही घेतली नसल्याचा आरोप अजित चव्हाण यांनी करत संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर सीमा हिरे या कार्यक्रमातून निघून गेल्या.

अजित चव्हाण यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले की, समस्त नाशिककरांच्या आदरास पात्र असलेल्या लाखो मतांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदारांचा अपमान होतो.
आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मंत्री बघत बसत असतील तर व्यक्ती म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील घसरणारा हा स्तर पाहून वाईट वाटत आहेच,
पण पक्षाचा सह मुख्यप्रवक्ता म्हणून या प्रकाराची अतिशय गंभीर दखल घेऊन मी याचा निषेध व्यक्त करतो.
राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (CM Eknath Shinde ) यांच्यापर्यंत ही नाराजी पोचवली जाईल
आणि त्यांनाही झालेल्या प्रकार आवडेल असं मला वाटत नाही, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | your ministership is because of bjp anger from what happened in
nashik bjp slam dada bhuse and uday samant minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा