Maharashtra Politics Opinion Poll 2024 | आगामी निवडणुकीत ‘महायुती’ची वाट कठीण, महाराष्ट्रात काय असेल स्थिती, सीव्होटर सर्व्हेतील अंदाज जाणून घ्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics Opinion Poll 2024 | आज जर महाराष्ट्रात लोकसभानिवडणूक झाली तर मविआला ४८ पैकी २६ जागा मिळताना इंडिया टुडे-सीव्होटरच्या ओपिनिअन पोलमध्ये दिसत आहे. तर भाजपा महायुतीला २२ जागा मिळताना दिसत आहेत. महायुतीची आगामी वाटचाल सोपी नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. (Lok Sabha Elections 2024)

४० पेक्षा जास्त जागा मिळण्याचा दावा करत असलेल्या भाजप – एकनाथ शिंदे गट – अजित पवार गट यांना सावध करणारा हा सर्व्हे आहे. मागील एका सर्व्हेमध्ये देखील महायुतीची वाट बिकट असल्याचे दिसून आले होते. (Maharashtra Politics Opinion Poll 2024)

सीव्होटरच्या सर्व्हेनुसार, महाविकास आघाडीला आगामी लोकसभेत मिळत असलेल्या जागा पक्षनिहाय पाहिल्या तर काँग्रेसला १२, शिवसेना उद्धव गट आणि एनसीपी शरद पवार गटाला १४ जागा मिळताना दिसत आहेत. भाजपा युतीला ४०.५ टक्के मते तर मविआला ४४.५ टक्के मते मिळताना दिसत आहेत.

दरम्यान, राज्यात भाजपा ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असला तरी इतक्या जागा सध्यातरी मिळताना दिसत नाहीत. मात्र, राज्यातील आगामी निवडणुकांची व्युहरचना अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने या सर्व्हेच्या चित्रात बदल होण्याची शक्यता आहे.

कारण अद्याप महायुती असो की, मविआ असो, त्यांचे जागावाटपाचे फॉर्म्युले अद्याप ठरलेले नाहीत.
शिवाय, यावेळी मविआमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचा समावेश होण्याची शक्यता आहे.
तसे झाले तर निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो.

इंडिया टुडे-सीव्होटरच्या ओपिनिअन पोलमधील अंदाज पाहिल्यास भाजपाने अजित पवारांना सोबत घेऊन, तसेच
शरद पवारांचा पक्ष फोडून देखील मविआवर वरचढ ठरणे कठीण जाणार असल्याचे दिसत आहे.

तसेच २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना अखंड होती. यामुळे एनडीएने ४१ जागा जिंकल्या होत्या.
यापैकी भाजपाने २२ आणि शिवसेनेने १९ जागा जिंकल्या होत्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : फेक कॉल केल्याच्या संशयावरुन उबेर चालकाकडून तरुणाला मारहाण, तिघांवर FIR

पिंपरी : जुन्या केसच्या कारणावरुन दोघांमध्ये मारहाण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

तळेगाव दाभाडे : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून सलून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

ब्लॅकमेलच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; विवाहित महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

Nagpur Police News | पुण्यापाठोपाठ नागपुरातही गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांसमोर परेड; दिला कायद्याचा डोस, गडबड केल्यास कठोर कारवाईचा इशारा

Pune Hadapsar Crime | आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने भर रस्त्यात रोखले पिस्तुल; दुचाकी घासल्याने तरुणाला दिली जीवे मारण्याची धमकी

लग्न करण्याचे आश्वासन देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार, हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : 65 वर्षीय नराधमाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत FIR

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन शरीर संबंधाची मागणी, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील धक्कादायक प्रकार

Pune BJP | विविध क्षेत्रातील सुमारे 200 महिलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश