Maharashtra Politics | ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’; फडणवीसांपेक्षा, शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनेकडून जाहिरातबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आजपर्यंत ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात आपल्याला झळकताना पाहायला मिळाली आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने (Advertisement In News Papers) राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. ही जाहिरात तुफान व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला (BJP) 30.2 टक्के आणि शिवसेनेला (Shivsena) 16.2 टक्के जनतेने दिला कौल आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला (BJP-Shivsena Alliance) पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार…असे या जाहिरातीमध्ये नमुद केले आहे.

दरम्यान या जाहिरातीवर भाजप नेते अतुल भातळकर (BJP leader Atul Bhatalkar) यांनी प्रतिकिया दिली आहे.
आमचे सरकार पुन्हा बहुमताने निवडून येणार असल्याचे या सर्व्हे मधून समोर आले आहेत.
मात्र देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी जाहिरात आम्ही कधीच दिली नव्हती.
तर जाहिरातमध्ये देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे असा उल्लेख आहे.
विशेष म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच आगामी निवडणुका मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही
लढवणार असल्याचे जाहीर केले असल्याचे भातळकर यांनी म्हटले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, “एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहे. तर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख आहेत. त्या आशयाने जाहिरातीत तसे लिहिले असावे. या राज्यातल्या जनतेने दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांनी चांगले काम केले होते. मुळात कोण मोठे, कोण लहान हे शिवसेना भाजपात महत्त्वाचे नाही.”

Web Title : Maharashtra Politics | pm narendra modi hold in country and maharashtra cm eknath shinde hold in state shiv sena advertisement in news paper

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? 1 लिटरसाठी द्यावे लागतील इतके रुपये; जाणून घ्या

Pune Gold Rate Today | पुणेकरांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Marketyard Fir News | मार्केटयार्ड परिसरात भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर जखमी