Maharashtra Power Plants | राज्यात 5 हजार 220 मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार ! महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार

मुंबई :- Maharashtra Power Plants | ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती (Mahanirmiti), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University), महाऊर्जा (Mahaurja) आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) Satluj Jal Vidyut Nigam (SJVN) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. या माध्यमातून सुमारे ४१ हजार कोटींची गुंतवणूक आणि ६ हजार ७६० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. (Maharashtra Power Plants)

आज सहयाद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला (Abha Shukla IAS), महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (Lokesh Chandra IAS), महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (Sanjeev Kumar IAS ), महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन (Anbalagan P IAS), सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर (Geeta Kapur, Sjvn Ltd), उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी (Dr Shrikar Pardeshi IAS), महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील (Vice Chancellor Dr. Prashant Patil ), मेडाच्या महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे (Kadambari Balkawade IAS ), स्वतंत्र संचालक विश्वास पाठक (Vishwas Pathak) आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Power Plants)

केंद्र आणि राज्य शासन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे. २०३० पर्यत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के विजेची पूर्तता नवीकरणीय ऊर्जेद्वारे करावयाची आहे.

ऊर्जा स्थिरतेसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवणुकीची गरज आहे. त्यासाठी महानिर्मितीने सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात
100 मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी
करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे ५०० कि.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात
उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास 472.19 कोटी खर्च अपेक्षित आहे.

महाऊर्जा -पुणे (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण)

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी येथे २५.६मे.वॅ. क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प
उभारण्यात येणार असून यासाठी ५१८ कोटीची गुंतवणूक होणार आहे.

सतलज जलविद्युत निगम लिमिटेड अंतर्गत

सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मे.वॅ.क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प
उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सौर, जल, पवन व उदंचन प्रकल्प उभारण्यासाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

Web Title :  Maharashtra Power Plants | 5 thousand 220 megawatt power will be produced in the state! MoU between Mahanirmati, Mahatma Phule Agricultural University, Mahaurja and SJVN

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | युती टिकवण्यासाठी भाजप-शिंदे गटाचा मोठा निर्णय, शंभूराज देसाईंनी दिली माहिती

Maharashtra Policemen Death During Swimming | पार्टीनंतर स्विमींगसाठी गेलेल्या पोलिसाचा बुडून मृत्यू

Congress Mohan Joshi On Prakash Javadekar | पुण्याबद्दल आकस नसेल तर माजी मंत्री प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी