Maharashtra Prison Department | ‘महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत यासाठी प्रयत्नशील’ – अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Prison Department | महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत यासाठी विषेश प्रयत्न करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठी अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता (ADG Amitabh Gupta) यांनी मंगळवारी राज्यातील सर्व कारागृहाचे उपमहानिरीक्षक व सर्व मध्यवर्ती कारागृहांच्या अधीक्षकांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये कारागृह विभागातील अडी-अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. (Maharashtra Prison Department)

कारागृहात विविध प्रकारच्या गुन्हयातील अपराधी बंदवान म्हणून येतात. त्यावेळी त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून त्यांना एक उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा कसे पाठवता येईल यासाठी कारागृह विभाग फार महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन असे आहे. त्याच पार्श्वभुमीवर अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सर्व कारागृह उपमहानिरीक्षक सर्व मध्यवर्ती कारागृहांच्या अधीक्षकांची एक महत्वाची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी खालील सुचना दिल्या आहेत. (Maharashtra Prison Department)

अमिताभ गुप्ता यांनी कायद्यानुसार बंद्यांना ज्या सोयी-सुविधा देणे बंधनकारक आहे त्या दिल्याच गेल्या पाहिजेत आणि कायद्यानुसार ज्या सोयी-सुविधा देण्यावर बंधेने आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे सांगितले आहेत. तसेच कारागृहातील सर्वबंद्यांची वैद्यकीय चाचण्या (रक्त तपासणी, ईसीजी, शुगर, युरिन, इत्यादी) दि. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करून घ्याव्यात असे सांगितले आहे. ज्या बंद्यांना हार्ट अटॅक, टीबी आणि एड्स सारखे गंभीर आजार आहेत अशा बंद्यांच्या आरोग्याकडे सेवाभावी संस्था, सीएसआर किंवा जिल्हा रूग्णालय यांच्या मदतीने अधिक लक्ष द्यावे अशी सूचना केली आहे.

ज्या कारागृहांमध्ये महिला बंदी ठेवण्यात येतात अशा कारागृहांनी क्रेंच सिस्टीम (पाळणाघर) दि. 15 फेब्रुवारी 2023
पर्यंत सुरू करावे, बंद्यांच्या आहारातील अन्नधान्य हे खाण्यायोग्य प्रतीचे असावे आणि कारागृह उपहारगृहातून
(कँटीन) ज्या खाद्योपयोगी वस्तू विकल्या जातात त्यांचा दर्जा चांगला असला पाहिजे अशा सचूना
अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी आढवा बैठकीत दिल्या आहेत.

Web Title :- Maharashtra Prison Department | ‘Maharashtra jails should be reformed’ – Upper Director General of Police Amitabh Gupta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

KL Rahul-Athiya Shetty Wedding | लग्नाची तारीख विचारताच अथिया शेट्टीने दिली हि रिअ‍ॅक्शन; Video व्हायरल

PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…