PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – PM Narendra Modi In Mumbai | विविध विकास कामांच्या भूमिपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (दि.१९) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा बीकेसी मैदानावर आयोजीत करण्यात आली आहे. त्याठिकाणी पार्किंगची जागा कमी पडू नये यासाठी आता मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आली आहे. त्यावर मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. (PM Narendra Modi In Mumbai)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार असून यावेळी त्यांच्या हस्ते बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पध्दतीने विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था व्हावी, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या भिंती तोडण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप नोंदविला. त्यावेळी, राजकीय कार्यक्रमासाठी अजून किती वेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा संतप्त सवाल देखील यावेळी या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

यावरून विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल माटेले म्हणाले, ‘कलिना कॅम्पसची भिंत पाडून मुंबई महापालिका आणि विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची सुरक्षा धोक्यात आणली आहे. तसेच राजकीय कार्यक्रमांसाठी विद्यापीठाचा कॅम्पस वापरणे कितपत योग्य आहे?’ असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

तसेच, यावर युवासेनेने देखील आक्षेप नोंदविला. युवासेनेचे नेते प्रदिप सावंत म्हणाले,
‘विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्यांसाठी तीन प्रवेशद्वार आहेत.
मात्र, तरीही महापालिकेने भिंत पाडून रस्ता तयार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहे.’ (PM Narendra Modi In Mumbai)

दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका जाणून घेतली असता,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी येणाऱ्यांना जवळच पार्कींग सुविधा उपलब्ध व्हावी,
यासाठी ही भिंत तोडण्यात आली असून आजच्या कार्यक्रमानंतर मुंबई महापालिकेकडून ही भित पुन्हा
बांधण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title :- PM Narendra Modi In Mumbai | student expressed anger after mumbai university campus wall break by bmc for pm modi program

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

KL Rahul-Athiya Shetty Wedding | लग्नाची तारीख विचारताच अथिया शेट्टीने दिली हि रिअ‍ॅक्शन; Video व्हायरल

Nandurbar Police News | दंडपाणेश्वर मंदिर संस्थेकडून एसपी पी.आर.पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार