Maharashtra Prison Department | कारागृह विभागातील अधिक्षकांची पदोन्नती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Prison Department | गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागातील अधीक्षक, कारागृह मध्यवर्ती कारागृह, गट –अ या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातंर्गत गृह विभागाच्या गठीत नागरी सेवा मंडळाची बैठक रविवारी (दि.8) पार पडली. नागरी सेवा मंडळाच्या या बैठकीतील शिफारशीनुसार अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-१ अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीचा आदेश शासनाने सोमवारी (दि.9) जारी केला आहे. (Maharashtra Prison Department)

पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी हार्दिक अभिनंदन केले व जबाबदारीच्या पदावर कर्तव्य बजावतांना कारागृह विभागाचे नाव उंचावेल अशा प्रकारचे काम करणेबाबत निर्देश दिले. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) डॉ.जालिंदर सुपेकर यांनी देखील पदोन्नत अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून कारागृह विभागात प्रभावीपणे काम करण्यास शुभेच्छा दिल्या. (Maharashtra Prison Department)

मंगळवारी (दि.10) कारागृह मुख्यालयात मासिक आढावा बैठकीच्या निमीत्ताने सर्व पदोन्नत अधिकारी उपस्थित होते.
अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अमिताभ गुप्ता,
विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, औरंगाबाद यु.टी.पवार यांच्या उपस्थितीमध्ये पदोन्नत अधिकारी यांचे अभिनंदन करून विभागाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच 6 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह व सुधार सेवा विभागात
सद्य:स्थितीत मंजूर असलेल्या ५०६८ पदांव्यतिरिक्त विविध संवर्गात दोन हजार पदे निर्माण करण्यास मान्यता
देण्यात आलेली आहे. यामुळे कारागृह अधिकारी/कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे म्हणत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 18 लाखांचा गंडा

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम