Maharashtra Rain Update | राज्यात ‘धो-धो’ ! मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | मागील दोन आठवड्यापासून राज्यात पाऊस (Maharashtra Rain Update) सक्रिय झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने कहर केला आहे. तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप कायम आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पावसाची सरी कोसळताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra), विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada) तसेच कोकणात (Konkan) पावसाने दाणादाण उडवून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच मुंबईसह (Mumbai) कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवली आहे.

 

 

मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. ”ताज्या सॅटेलाईट आणि रडारचे निरीक्षण केल्यास मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. आगामी काही तास या भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत माहिती केएस होसलीकर (K.S. Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Maharashtra Rain Update)

राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, मंगळवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला होता.

 

Web Title :- Maharashtra Rain Update | heavy rainfall likely to continue for next
three hrs over mumbai thane and parts of raigad and palghar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा