Maharashtra Rain Update | उद्यापासून राज्यात पाऊस कोसळणार; 24 जूनपासून जोर वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणात (Atmosphere) सातत्याने बदल होत आहेत. काही भागात गरमी, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून (दि. 23 जून) राज्याच्या काही भागात पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील (Konkan) काही भागांसह मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि विदर्भात (Vidarbha) पावसाची शक्यता आहे. 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मराठवाड्यात (Marathwada) काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचे (Monsoon) आगमन उशिरा झाल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. बळीराजा (Farmer) आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. काही भागात धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी पुन्हा दुबार पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने (Mumbai Regional Meteorological Centre)
वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. पाऊस (Rain) सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नाही. त्यामुळे अशात शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस म्हणजे 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, असे तज्ज्ञाकडून सांगितले जात आहे.

Web Title :  Maharashtra Rain Update | rain forecast in the state from tomorrow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा