Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात 15 जुलै पासून पावसाचा (Maharashtra Rain Update) जोर वाढला असल्याचे पाहायला मिळाले. तेव्हापासून राज्यातील अनेक भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाची गती कमी झाली असल्याचे पाहायला मिळाले. सध्या राज्यात पावसाचा जोर ओसरला असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, राज्यात पुढील तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर पुणे (Pune), ठाणे (Thane), पालघर (Palghar), मुंबई (Mumbai), रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad) आणि सातारा (Satara) सात ठिकाणीच आज (शुक्रवार) यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. शनिवारी पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच या अंदाजानुसार परिस्थिती पाहायला मिळत आहे.
कोकण (Konkan) आणि विदर्भातील (Vidarbha)
काही भाग वगळला असता मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. तर काही भाग पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागातील वातावरण ढगाळ असणार आहे.
तर, पावसाच्या तुरळक सरी अधुनमधून बरसणार आहेत.
तर नवी मुंबईत पाऊस काहीसा जोर धरेल पण,
पश्चिम उपनगरांमध्येही हलक्या सरींची शक्यता आहे. पण,
मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)