Maharashtra Rain Update | राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस, विदर्भात आज ‘यलो अलर्ट’; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यातील काही भागात पावसाची (Maharashtra Rain Update) रिपरिप सुरूच आहे. पण काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पुण्यासह (Pune) काही शहरात पावसाचा वेग कमी झाला असला तरी मुंबईसह (Mumbai) उपनगर, ठाणे (Thane) जिल्ह्यासह कोकणात (Konkan) चांगला पाऊस पडत आहे. तसेच अन्य काही जिल्ह्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) दिलेल्या अंदाजानुसार आज (बुधवारी) विदर्भासह (Vidarbha) मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

काही भागात पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकरी (Farmer) चिंतेत पडला आहे. दरम्यान, हवामानाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस (Maharashtra Rain Update) झाला आहे. मराठवाड्यातही गंभीर परिस्थिती असून, त्या ठिकाणी सरासरीच्या 38 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.

लातूर जिल्ह्यात (Latur District) काही भागात पाच ते सात दिवसांपासून पावसाने (Rain) पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस खूपच कमी ठिकाणी झाला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे मात्र अजूनही आभाळाकडे लागले आहेत. त्यामध्ये वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरम्यान, मुंबईत जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळे जुनाट झालेले वृक्ष कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मालाड पूर्वेकडील दप्तरी रोड परिसरातील कासमबाग परिसरात एक झाड कोसळल्याची
दुर्घटना घडली आहे. तर दुसरीकडे अमरावतीच्या (Amravati) वरुड तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. मात्र, आता या पावसामुळे शेती कामांना वेग येणार आहे.

Web Title :   Maharashtra Rain Update | yellow alert for rain in vidarbha today imd monsoon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा