Maharashtra Rains | राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी गारपीट, 3 तासांत ‘या’ जिल्ह्यांत बरसणार सरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय हवामान विभागाने (IMD) 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह (Maharashtra Rains) गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला होता. आज (मंगळवार) दुपारी दोनच्या सुमारास अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस (Maharashtra Rains) झाला तसेच काही ठिकाणी गारपीट (Hailstorm) झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली.

आज सकाळपासून अकोला जिल्ह्यातील (Akola District) वातावरणात मोठा बदल जाणवत होता. काही ठिकाणी ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) नोंद करण्यात आली. तर मागील काही दिवसांपासून पडलेली कडाक्याची थंडी देखील कमी झाली होती. त्यानंतर दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह (Thunderstorm) जोरदार पावसाने (Maharashtra Rains) हजेरी लावली. काही वेळात पावसाचा जोर वाढला. शहराच्या अनेक भागात गारपीट देखील झाली.

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
विजांच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील कापूस, तूर, हरभरा, गहू, कांदा आणि अन्य पीकांचे मोठ्या प्राणात नुकसान झाले आहे. आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आस्मानी संकट कोसळले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस
बुलडाणा जिल्ह्यात (Buldana District) देखील ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर या तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) श्रीरामपूर, नेवासा, या तालुक्यात गारपीट झाली. गारपीटीमुळे द्राक्षे, गहू, कांदा, हरबऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पुढील 3 तासात या जिल्ह्यात पाऊस
येत्या काही तासात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार आहे. पुढील तीन तासांत नाशिक, अहमदनगर आणि नागपुर
मध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.
तर औरंगाबाद, जालना आणि गडचिरोली या ठिकाणी येलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Rains | hailstorm with heavy rainfall in akola washim buldhana ahmednagar weather in maharashtra imd alerts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून डायलेसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी

Income Tax Alert | जर कॅशमध्ये केली ‘ही’ 5 कामे तर येईल टॅक्स संदर्भात नोटिस ! जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नियम

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 59 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी