Coronavirus in Maharashtra : दिलासादायक ! गेल्या 24 तासात 59,073 रूग्ण झाले कोरोनामुक्त, 34,848 नवे पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रुग्णसंख्या वाढीसोबतच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 34,848 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59,073 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये 960 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 53,44,063 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. मात्र, त्यापैकी 47,67,053 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या कोरोनाचे 4,94,032 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 80,512 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात सध्या 34,47,653 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 28,727 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण

पुण्यात आत्तापर्यंत 9,68,464 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 8,64,847 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10,314 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 93,245 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासांत 1147 नवे रुग्ण

मुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 1,147 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 2,333 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 36,674 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. आत्तापर्यंत 6,34,315 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.