दिलासादायक ! गेल्या 24 तासांत 37,236 कोरोनाचे नवे रुग्ण तर 549 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना आज मात्र ही संख्या कमी होताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 37,236 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 61,607 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, यामध्ये 549 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 51,38,973 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामध्ये आत्तापर्यंत 44,69,425 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 5,90,818 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, आत्तापर्यंत 76,398 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सध्या 36,70,320 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 26,664 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुण्यात रुग्णसंख्या लाखाच्या घरात

राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. आत्तापर्यंत 9,30,809 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये 8,23,099रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10,059 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच पुण्यात सध्या 97,593 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत 47 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत आत्तापर्यंत 6,77,412 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये 6,14,663 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 13,855 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 47,054 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.