Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेपासून इयत्ता 1 ली पासूनचे सर्व वर्ग सुरू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra School Reopen | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्वच शाळा, काॅलेज बंद होत्या. मागील दोन महिन्यापांसून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास ठाकरे सरकारने (Thackeray Government) परवानगी दिली. मात्र पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी नव्हती. आता पहिलीपासून शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू होणार आहेत.

पहिलीपासूनचे विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्यांना संसर्ग होणार नाहीत याबाबतची काळजी घेऊन आपण त्यांना शाळेमध्ये जाऊ दिलं पाहिजे. 1 ली ते 4 थीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं (Child Task Force) परवानगी द्यावी असं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मांडलं होतं. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कॅबिनेटच्या बैठकीत शाळा सुरूबाबत अंतिम निर्णय होईल. असंही टोपे म्हणाले होते. या पार्श्वभुमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 1 डिसेंबर पासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मंत्रिमंडळ, पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितलं आहे. (Maharashtra School Reopen)

Web Title : Maharashtra School Reopen | all schools from 1st to 7th standard will start from 1st december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या